आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधी हुकली: तलाठी परीक्षेला 2351 उमेदवारांची दांडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- तलाठीपदाच्या रिक्त जागांसाठी रविवारी शहरातील 27 परीक्षा केंद्रांवर 7 हजार 770 परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, त्यात 2 हजार 351 परीक्षार्थींनी या परीक्षेकडे पाठ फिरवली.

तलाठीपदासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि भुसावळ तालुक्यातील परीक्षार्थींनी शहरातील केंद्रांवर परीक्षा दिली. परीक्षा केंद्रातील प्रत्येक खोलीत 24 उमेदवारांची बैठक व्यवस्था होती. परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी 688 कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रत्येक परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, तहसीलदार वैशाली हिंगे, बबनराव काकडे यांनी परीक्षा केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. काही उमेदवार प्रवासातील अडथळ्यांमुळे नियोजित वेळेपर्यंत पोहोचू शकले नाहीत. परीक्षा केंद्र गाठण्यासाठी जळगावसह अन्य जिल्ह्यातून आलेल्या परीक्षार्थींची मात्र धावपळ उडाली.

या शाळांमध्ये झाली परीक्षा
डी. एस. हायस्कूल, सेंट अलॉयसिस, के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोटेचा महिला महाविद्यालय, मध्य रेल्वे उच्च्स्तर माध्यमिक विद्यालय (इंग्रजी माध्यम), र्शी संत गाडगे महाराज हिंदी विद्यालय, देवकरण लक्ष्मीनारायण हिंदी विद्यालय, टेमाणी हिंदी कन्या विद्यालय, उसामा उर्दू व कनिष्ठ महाविद्यालय, नॅशनल उर्दू गल्र्स हायस्कूल, बी.झेड. उर्दू हायस्कूल खडका रोड, भोळे महाविद्यालय, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, म्युनिसिपल हायस्कूल, बियाणी स्कूल.

परीक्षा शांततेत
परीक्षेचे अतिशय सूक्ष्म नियोजन केल्याने सर्व केंद्रांवर ही परीक्षा शांततेत पार पडली. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार आदर्श नियमावलीचा वापर करण्यात आला. 668 कर्मचारी परीक्षा प्रक्रियेसाठी नियुक्त केले होते.
-विजयकुमार भांगरे, प्रांताधिकारी