आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 तासांत मिळणार निकाल; तलाठी परीक्षेची प्रश्नपत्रिका छापली पहाटे 5 वाजता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मध्यरात्रीनंतर प्रश्नपत्रिका छापून पहाटे 5.00 वाजता प्रश्नपत्रिकांचे केंद्रांना वाटप करणार्‍या महसूल प्रशासनाने तलाठी भरती प्रक्रियेतून गती सिद्ध केली. सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जिल्हाभरातून आलेल्या उत्तरपत्रिका जमा करून सायंकाळी 6.00 वाजता उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात केली. रात्रभर ही प्रक्रिया चालणार असून 15 तासांच्या आत संपूर्ण निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, परीक्षेनंतर चार तासात संकेतस्थळावर अँन्सर-की उपलब्ध करून देण्यात आली.

10,372 उमेदवार गैरहजर
जिल्हा निवड समितीतर्फे तलाठी पदासाठी रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेला 10 हजार 372 उमेदवार गैरहजर होते. 44 जागांसाठी जिल्ह्यातील 121 केंद्रांवर 25 हजार 543 उमेदवारांनी परीक्षा दिली. 200 गुणांसाठी 100 प्रश्नांची लेखी परीक्षा घेण्यात आली. तलाठी पदाच्या लेखी परीक्षेसाठी जळगाव शहरात 40 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सोमवारी सुटी असल्याने मंगळवारी संपूर्ण निकाल जाहीर केले जाण्याची तयारी आहे.

अशी आहे प्रक्रिया
पाच सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसमोर मीटिंग हॉलमध्ये उत्तरपत्रिका तपासल्या जात आहेत. पेटीत सीलबंद उत्तरपत्रिका उपजिल्हाधिकार्‍यांसमक्ष उघडून ओएमआर (ऑप्टिकल मॉक्स रीडर)मध्ये सोडल्या जात आहेत. तासाला 4000 उत्तरपत्रिका तपासण्याची क्षमता असलेले हे मशीन उत्तरपत्रिकेवरील क्रमांक, उमेदवाराचा क्रमांक आणि मार्क केलेल्या उत्तरांची जागा रीड करते. त्यानंतर रेकॉर्डसाठी उत्तरपत्रिकेचे स्कॅनिंग केले जात आहे. संपूर्ण उत्तर पत्रिकेचे स्कॅनिंग झाल्यानंतर ओएमआर मशीनला अँन्सर-की दिली जाईल, त्यानंतर तासाभरात संपूर्ण निकाल जाहीर होतील. या प्रक्रियेची मोजणी सुरू झाल्यापासून 12 ते 15 तासांचा वेळ लागणार आहे.