आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांबापुरात कायमस्वरूपी पोलिस चौकी हवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - तांबापुरा दंगलीच्या पार्श्वभूमीवर हटकर चौकासह बिलाल चौक भागात पोलिस चौकी सुरू करावी, या मागणीसाठी शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी अप्पर पोलिस अधीक्षक एन.अंबिका यांना मंगळवारी निवेदन दिले. तसेच या दंगलीतील संशयितांवर प्राणघातक हल्ल्याचे कलम लावल्यामुळे त्यांना जामीन मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी हे कलम हटवावे व सहायक पोलिस महासंचालक जावेद अहमद यांच्याकडून या दंगल प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना अय्याज अली, मौलाना अब्दुल हमीद, जाकीर शेख, शेख उस्मान आदी उपस्थित होते.