आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमधील तांबापुरातील 40 दंगलखोरांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- तांबापुरात बुधवारी झालेल्या दंगलप्रकरणी 40 संशयितांना अटक करण्यात आली. या सर्व आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गुरुवारी 19 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, विशेष पोलिस महानिरीक्षक धनंजय कमलाकर यांनीही तांबापुराची पाहणी करून संचारबंदी 24 तासांनी वाढवण्याचे आदेश दिले. दरम्यान, दुपारी 1 वाजेपर्यंत डीमार्ट बंद ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी तांबापुरात नळांना पाणी येणार असल्याने काही वेळ संचारबंदी शिथिल करण्यात येणार आहे.

संचारबंदीमुळे परिसरात स्मशानशांतता; कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आणखी 19 संशयितांना घेतले ताब्यात, विशेष पोलिस महानिरीक्षकांची भेट, हलगर्जीपणा करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांवर होणार कारवाई, संचारबंदी वाढवली

सूत्रधारांपर्यंत पोलिस पोहोचणार
बुधवारी तांबापुरा भागात विविध ठिकाणी जातीय बैठका घेण्यात आल्या. तसेच या बैठकांनंतरच दगडफेक सुरू झाली. त्यामुळे या बैठका कोणी घेतल्या? त्यांचा उद्देश काय? याची माहिती पोलिसांच्या गोपनीय पथकाने मिळवली आहे. त्यानुसार दंगल घडवून आणण्याचा प्रकार घडला असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्यामुळे आता या बैठकांचे नेतृत्व करणार्‍या सूत्रधारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती कमलाकर यांनी दिली.

हलगर्जीपणा भोवणार
तांबापुरात मंगळवारी झालेल्या दंगलीनंतरही बुधवारी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला गेला नाही. तसेच या वेळेत बंदोबस्तासाठी नियुक्त असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी हलगर्जीपणा केला असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. धनंजय कमलाकर, विशेष पोलिस महानिरीक्षक

अधिक वृत्‍त वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...