आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन तरूणींची छेडछाड; मवाल्यास भावाचा चाेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात घरफोडी, लुटमारी, चोरीच्या घटनांनी कहर केला आहे. त्या रोखण्यास पोलिसांना नाकीनऊ येत असताना आता मुलींच्या छेडछाडीचे प्रकार सुरू झाले आहे. शुक्रवारी शहरात दोन मवाल्यांनी दोन तरूणींची छेड काढली. यात एकाला मुलीच्या भावाने मारहाण केली. तर दुसऱ्या घटनेत पोलिसांनी तरुणाला समज देऊन सोडले.

आयएमआर कॉलेजजवळून शुक्रवारी सकाळी ११ वाजता विद्यार्थिनी जात होती. या वेळी एका मवाल्याने तिचे नाव घेत छेड काढली. त्यामुळे संतापलेल्या तरुणीने हा प्रकार आपल्या
भावाला मोबाइलवरून सांगितला. काही वेळेनंतर तरुणीचा भाऊ त्यांचे २० ते २५ मित्र दुचाकीवर महाविद्यालयाजवळ आले. छेड काढणाऱ्या मवाल्याचा शोध घेऊन त्याची चांगलीच धुलाई
केली. त्यामुळे परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. हा प्रकार पोलिसांना समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. पण पोलिसांना पाहून युवक पळून गेले.
युवकालासमज : दुसऱ्या एका प्रकरणात विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या कांचननगरातील प्रशांत एकनाथ सोनवणे या विद्यार्थ्याला जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला समज
देऊन नंतर सोडून देण्यात आले.

निर्भया पथक गेले कुठे
१०महिन्यांपूर्वी मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढ होते. त्यामुळे या मवाल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस दलाने निर्भया पथक नियुक्त केले होते. हे पथक महाविद्यालय परिसर
विविध लव्ह पॉइंट असलेल्या ठिकाणी गस्त घालत होते. प्रेमीयुगलांना पकडून समज देत होते. पण आता निर्भया पथकाची कामगिरी थंडावलेली आहे.