आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तनयने बक्षिसात मिळालेली कार दिली गुरूला तर 4 लाख सेवाभावी संस्थांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एका खासगी वाहिनीच्या नृत्य स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या तनय मल्हाराने अापण कसे मास्टर अाहाेत. त्याचे उत्तम उदाहरणच अापल्या वागण्यातून सिद्ध करून दिले. तनयला मिळालेल्या बक्षिसापैकी 4 लाख रुपये त्याने शहरातील काही सेवाभावी संस्थांना तर पारिताेषिक म्हणून मिळालेली चारचाकी अापल्या गुरुप्रंती ऋण व्यक्त करत त्यांना भेट स्वरुपात देत असल्याचे त्याने एका सत्कार कार्यक्रमात जाहीर केले.

जळगावचा सुपुत्र तनय मल्हारा एका खासगी वाहिनीवरील डान्स रिअॅलिटी-शाेचा विजेता ठरला असून मंगळवारी शहरात त्याचे जंगी स्वागत करण्यात अाले. विजेतेपदानंतर तनयला २५ लाख रुपये अाणि ह्युंदाई चारचाकी कार पारिताेषिक म्हणून मिळाली अाहे. २५ लाख रुपयांपैकी टॅक्स वगळता त्याला जवळपास १७ लाख रुपये मिळणार असून या लहानग्याने त्यापैकी लाख रुपये जळगावातील सेवाभावी संस्था, शाळा अाणि अापल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करत चारचाकीही भेट स्वरुपात देत नवा अादर्श समाजापुढे उभा केला अाहे. डान्समध्ये तर तनय मास्टर अाहेच परंतु अापल्या खासगी अायुष्यातही सेवाभावी वृत्ती दाखवत त्याने अापल्या बक्षिसाची रक्कम दान करून देशात जळगावची मान उंचावली अाहे. मास्टर तनय मित्र परिवार सत्कार समितीतर्फे सागर पार्क येथे अायाेजित सत्कार समारंभात त्याने ही मदत जाहीर केली. दरम्यान, रविवारी तनयची अंतिम फेरी पार पडली. या वेळी भारतातून ताे नृत्य कलेत अव्वल ठरला. त्यानंतर मंगळवारी शहरात दाखल हाेताच त्याचे भव्य स्वागत करण्यात अाले. या निमित्ताने खान्देश सेंट्रल माॅल येथून रॅली काढण्यात अाली. रॅलीचा समाराेप सागर पार्क येथे झाला.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून निसर्ग कवी पद्मश्री ना. धों. महानोर, आमदार सुरेश भोळे, उमविचे माजी कुलगुरू डॉ. के.बी. पाटील, उपमहापौर ललित कोल्हे, जैन इरिगेशन सिस्टीम्सचे संचालक अतुल जैन, फोकस ह्युंदाईचे संचालक येजदी पाजनीगरा, नगरसेवक अनंत जोशी, आनंद मल्हारा, नलिनी मल्हारा, अखिल तिलपुरे, अनिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी आपल्या लाडक्या मास्टर तनयच्या स्वागतासाठी हजारो जळगावकरांनी गर्दी केली होती. ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास मल्टी मीडिया फीचर्सच्या सहकाऱ्यांसह युवाशक्ती फौंडेशन फारुक शेख यांनी सहकार्य केले. समारंभासाठी जैन इरिगेशनचे संचालक अतुल जैन यांचे मार्गदर्शन लाभले.

गुरुदक्षिणेत कार दान
विजेताझाल्यानंतर तनयला ह्युंदाई कंपनीकडून मिळालेली आय-१० ही कार त्याने आपले गुरू तथा नृत्य दिग्दर्शक अखिल तिलकपुरे यांना गुरुदक्षिणा म्हणून भेट दिली. तसेच मिळालेल्या रोख रकमेपैकी एक लाख रुपये योगशिक्षिका अनिता पाटील यांना, एक लाख रुपये सेंट टेेरेसा या त्याच्या शाळेला, एक लाख रुपये अनुभूती स्कूल-२ ला तर एक लाख रुपये केशव स्मृती प्रतिष्ठान या संस्थेला मदत म्हणून देण्याची घाेषणा तनयचे वडील आनंद मल्हारा यांनी केली.

तुमच्यामुळेच मी विजेता
‘तुमच्यामुळेमी विजेता होऊ शकलो. रोड-शो दरम्यान सर्वजण जेव्हा माझे फोटो काढत होते. तेव्हा मला वाटले की तुम्ही माझे नाही तर मी तुमचे फोटो काढायला पाहिजे. माझ्या या प्रवासात दोन गोेष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे डान्स जो मला माझे गुरू अखिल तिलकपुरे यांनी शिकवला. दुसरी गोष्ट म्हणजे योगा जो मला अनिता पाटील यांनी शिकवला,’ असे मनाेगत तनयने केले.

रॅलीत उत्साह
रॅलीतवाहनांचा ताफा, घोडे, उंट, लेझीम पथक, शाळकरी मुलांसह जळगावकरांचा उत्साह पाहायला मिळाला. या वेळी ठिकठिकाणी तनयचे स्वागत, औक्षण करून पुष्पवृष्टीही करण्यात आली. समाराेपात तनयने ‘मैं तेरा जबरी फॅन हो गया’ या गाण्यावर नृत्य करून उपस्थितांना थिरकायला लावले. याच वेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून राष्ट्रगीताने समारंभाचा समारोप करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...