आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"टर्माइड क्विन'ची तस्करी, उधीची राणी’ किड्याला काळ्या बाजारात दोन हजाराहून अधिक भाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अनेक भागात टर्माइड क्विन तस्करांमुळे वारुळे नामशेष होत आहेत. ही वारुळे जमिनीवर तीन ते चार फूट उंच आणि जमिनीच्या आत दोन ते तीन फूट खोल असतात. जमिनीतील टाकाऊ घटकांचे विघटन करण्याचे महत्त्वाचे काम ते करतात. यामधील राणी आणि राजा किड्याचे सेवन केल्याने अनेक शारीरिक व्याधींचा रामबाण उपाय सापडतो, असा अपप्रचार होत आहे. परिणामी, या प्रजातींवर तस्करांची वक्रदृष्टी पडली असून ते भुसावळसह रावेर, यावल, चोपडा आणि जामनेर तालुक्यात क्विन आणि िकंग टर्माइडला जिवंत पकडून त्यांची काळ्या बाजारात विक्री करत आहेत.
-वनविभागाच्या जमिनीवरील वारुळे नष्ट होत असतील, तर निश्चित कारवाई होईल. याबाबतची माहिती असणाऱ्यांनी वनविभागाशी संपर्क साधावा. यू.जी. कडलग, उपवनसंरक्षक, जळगाव

का होतेय तस्करी ?
उधीचाराजा किंवा राणी यांच्यात अनेक प्रकारचे प्रोटिन्स असतात. हा किडा खाल्ल्यास पाठदुखी, सांधेदुखी आणि मणक्यांचे कोणतेही विकार होत नाहीत, असा अपप्रचार होत आहे. यामुळे या किड्याला प्रचंड मागणी आहे. सध्या दीड ते दोन हजार रुपयांना एका किड्याची विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय आहे उधी?
घरातीलजुन्या लाकडी वस्तूंवर उधी या उपद्रवी किडींचा प्रादुर्भाव होतो. उधीच्या जगभरात हजारांवर जाती असून वारूळ निर्माण करणारी उधी भुसावळ तालुक्यात सर्वाधिक आहे. मधमाश्यांच्या वसाहतीप्रमाणे त्यांचे कार्य चालते. तसेच इतर किडे कामगारांप्रमाणे काम करून वारुळाची निर्मिती करतात. जैवविविधतेमध्ये हा घटक महत्त्वाचा मानला जातो.

- जैवविविधता संरक्षण कायदा २००२नुसार याबाबत कारवाई होऊ शकते. मात्र, कारवाई होत नाही. वन आणि वन्यजीव विभागाला माहिती दिली आहे. अनिलमहाजन, अध्यक्ष, चातक निसर्ग संवर्धन संस्था
हेमंत जोशी भुसावळ

माळरानआणि गवताळ जंगलात टर्माइड म्हणजेच "उधीचे वारूळ' झपाट्याने नष्ट होत आहेत. उधीच्या वारूळनिर्मितीत प्रमुख भूमिका असलेल्या टर्माइड क्विन आणि ग्रामीण भागात उधीची राणी म्हण्ून ओळखल्या जाणाऱ्या किड्याला बाजारात तब्बल दीड ते दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे. या किड्यांच्या तस्करीत भुसावळातील टो प्रसिद्ध आहे.