आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टाटिया शिशुगृहाच्या मान्यतेला ‘धोका’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - टाटिया शिशुगृहातील अनागाेंदी कारभाराची गंभीर दखल घेऊन बालकल्याण समितीच्या अायुक्तांनी शिशुगृहाच्या संचालकांना नाेटीस बजावली अाहे. यात येत्या १० दिवसांच्या अात खुलासा सादर करण्याचे अादेश दिले अाहेत. एवढेच नव्हे तर या प्रकरणाची सविस्तर माहिती महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनाही सादर करण्यात येणार अाहे. अनागाेंदी कारभारामुळे टाटिया शिशुगृहाच्या मान्यतेला ‘धोका’ निर्माण झाला अाहे.
टाटिया शिशुगृहातून दाेन मुले पळून गेली हाेती. तसेच साई या बाळाच्या दत्तक प्रकरणात नियमांचा भंग झाल्याचे अाढळून अाले हाेते. त्यानंतर जळगावच्या बालकल्याण समितीने या प्रकरणाची चाैकशी करून अापला अहवाल नाशिकचे बालकल्याण समितीचे अायुक्त के.एम. नागरगोजे यांना अहवाल पाठवला हाेता. त्यानंतर अायुक्तांनी टाटिया शिशुगृहाच्या चाैकशीसाठी उपायुक्त बी.टी. पाेखरकर यांना जळगावात पाठवले हाेते. पाेखरकर यांनी दाेन दिवस शिशुगृहाच्या कागदपत्रांची तपासणी केली. तसेच शिशुगृहातील कर्मचारी बालकल्याण समितीच्या सदस्यांशी चर्चा करून काही माहिती जाणून घेतली. त्यानुसार त्यांनी अापला अहवाल बालकल्याण समितीचे अायुक्त नागरगाेजे यांना नुकताच सादर केला. अहवालात बाळ दत्तक प्रकरण आणि नियमांचा भंग करून बालके दत्तक दिल्याचे स्पष्ट दिसून अाले. त्यानुसार अायुक्तांनी टाटिया शिशुगृहाच्या संचालकांना नाेटीस बजावून १० दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे अादेश दिले अाहे. या अनागोंदी कारभारामुळे शिशुगृहाची मान्यताही रद्द होऊ शकते, असे संकेत दिलेे आहेत. त्यामुळे शिशुगृहाची मान्यता धाेक्यात अाली अाहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती अहवाल लवकरच महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनाही सादर करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

असुरक्षित असल्याने मुलांना हलवले
सुरक्षेच्या कारणामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेला साई टाटिया शिशुगृहातील चार मुली दोन बालकांना मंगळवारी बालकल्याण समितीने औरंगाबाद येथे हलवले अाहे. तेथील शिशुगृहामध्ये चांगली व्यवस्था काळजी घेतली जात असल्याने समितीने हा निर्णय घेतला आहे. त्या बालकांना सिडको येथील भारतीय समाज सेवा केंद्रात ठेवण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात ही बालके औरंगाबाद येथील बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात येतील. पुढील निर्णय होईपर्यंत ही बालके आैरंगाबादच्या बालकल्याण समितीच्या कस्टडीत राहतील.
कारवाईची टांगती तलवार
‘कारा’च्यानियमांना महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव वीरेंद्र धोका यांनी न्यायालयात आव्हान दिलेले आहे. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही शिशुगृहाकडून नियमांचे उल्लंघन करून बालके दत्तक देण्यात आली आहे. ‘कारा’च्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणीही केलेली नाही. त्याचप्रमाणे शिशुगृहात बालकांना पोषक वातावरण नसल्याचे तपासणीत आढळून आले होते. त्यामुळे महिला बालविकास आयुक्त के. एम. नागरगोजे यांनी टाटिया शिशुगृहाला १० दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खुलासा सादर केल्यास शिशुगृहाची मान्यता रद्द होऊ शकते, असे संकेत दिले अाहे.
निर्णयापर्यंत बाळ आमच्या ताब्यात
जळगावच्या बालकल्याण समितीने त्या सहा बालकांचा ताबा आम्हाला दिला आहे. सद्य:स्थितीत ती बालके आमच्या शिशुगृहात ठेवण्यात आली आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे पुढील िनर्णय होईपर्यंत, ही बालके आमच्या ताब्यात राहतील. अॅड.रेणुकाघुले, अध्यक्ष, बालकल्याण समिती, औरंगाबाद

बालकल्याण समिती प्रक्रिया करेल
जळगावसिव्हिलमध्येअसलेला साई या बाळासह चार मुली दोन मुलांना जळगावच्या बालकल्याण समितीने औरंगाबादच्या बालकल्याण समितीच्या ताब्यात दिले आहे. आमच्या भारतीय समाज सेवा केंद्राला त्यांचा सांभाळ संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात ही बालके महिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार आहे. समिती त्यांची कायदेशीर प्रक्रिया करून त्यांना आमच्या कस्टडीत देईल. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने अधिक माहिती देता येणार नाही. वसुधाजातेगावकर, शाखा संचालिका, भारतीय सेवा समाज केंद्र, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...