आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटिया शिशुगृहाच्या कामकाजात त्रुटी, मात्र सर्व नियमांचे पालन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - टाटिया शिशुगृहाच्या कामकाजामध्ये नियमांचे पालन केलेले आहे. मात्र, त्यामध्ये अनियमितता त्रुटी असू शकते. त्या श्वास घेण्यासाठी लागणाऱ्या वेळेत पूर्ण करेल. संस्थेतून बालके दत्तक देताना कराच्या नियमांचे पालन केले आहे. तसेच जिल्हा न्यायालयात अर्ज करून दत्तक विधान केले असल्याचा दावा करणारा खुलासा जालना येथील महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशनने केला आहे. टाटिया शिशुगृहाला मान्यता रद्दची नोटीस दिल्यानंतर धोका यांनी महिला बालविकास आयुक्तांना हा खुलासा सादर केला आहे.
टाटिया शिशुगृहातून पाटील दांपत्याला साईनामक बाळ अवैधपणे दत्तक देणे, शिशुगृहातून पळून गेलेली दोन मुले आणि शिशुगृहाच्या कामकाजादरम्यान काराच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याबाबत महिला बालविकास उपायुक्त बी.टी.पोखरकर यांनी आयुक्तांना अहवाल सादर केला होता. त्यानंतर आयुक्तांनी टाटिया शिशुगृहाला मान्यता रद्द करण्याची अंतिम नोटीस देऊन खुलासा मागवला होता. त्यानुषंगाने फाउंडेशनचे सचिव वीरेंद्र धोका यांनी महिला बालविकास आयुक्तांना खुलासा सादर केला. या खुलाशात दावा करण्यात आला आहे की, टाटिया शिशुगृहाच्या वेळोवेळी झालेल्या तपासणीदरम्यान संस्थेच्या निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटींची नोंद घेतली आहे. त्यांचे निराकरण केले अाहे. त्यानंतर महिला बालविकास आयुक्त कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात आली नाही. कारणे दाखवा नोटीसबाबत सविस्तर खुलासा सादर केला आहे. संस्थेने केलेल्या खुलाशामधील काही शब्दांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. त्रुटी जाणून बुजून केल्या अथवा वाईट हेतूने ठेवल्या, असा त्याचा अर्थ नाही. मार्गदर्शक सूचनांमध्ये होत असलेल्या बदलांमुळे काही त्रुटी अनावधानाने होणे क्रमप्राप्त आहे. याचा अर्थ संस्थेने त्रुटी मान्य केल्या असा होत नाही. संस्था २००९पासून कार्यरत असताना अचानक २०१६मध्ये संस्थेच्या कामकाजाबाबत प्रतिकूल मत नोंदवणे बरेच काही सांगून जाते. संस्था नवीन इमारतीत स्थलांतरित करण्याबाबतचा अर्ज मे २०१६ रोजी सादर केलेला आहे. तो विचाराधिन आहे. संस्थेने कलम ५३ तरतुदींचा भंग केलेला नसून प्रवेशितांना पुनर्वसन सुविधा काटेकोरपणे पुरवल्या जात आहेत. संस्थेविरोधात कलम ४७-१ नुसार कारवाई करणे म्हणजे थोडक्यात प्रशासन नेमण्यासारखे आहे. संस्थेचा परवाना रद्द केल्यास कार्यभार शासनाने पाहावा, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. संस्थेने बाल न्याय अधिनियमानुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही केली असून कोणत्याही मुलाचे पुनर्वसनात तसेच दत्तक देण्यासाठी मुक्त करून घेण्याबाबत आदेश प्राप्त करून घेण्यात दिरंगाई केेली नाही. त्यामुळे संस्थेच्या विरोधात कारवाई करणे न्यायोचित होणार नाही, असे धोकांचे म्हणणे आहे.

कायद्याचे उल्लंघन नाही
संस्थेतील साई याच्या दत्तक विधानाबाबत झालेल्या घटनेबाबत खुलासा सादर केलेला आहे. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रारही देण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्याविरोधातही तक्रार दिलेली आहे. संस्थेने कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. त्रुटी अनियमितता श्वास घेण्यासाठी लागणाऱ्या वेळेत दूर करेल, असेही धोका यांनी खुलाशात नमूद केले आहे.
बातम्या आणखी आहेत...