आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tavera And Truck Accident At Akkalkuva, Five Dead

ट्रक-तवेराच्या भीषण अपघातात पती, पत्नी, आईसह पाच जणांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ/नंदुरबार- विवाहासाठी अहमदाबादला जाणाऱ्या तवेरा वाहनाला वेगाने येणाऱ्या ट्रकने गुरुवारी सकाळी जबर धडक दिली. या अपघातात जळगाव जिल्ह्यातील पाच जण ठार झाले. तर सहा जण जखमी झाले आहेत. अपघात अक्कलकुवा-खापर रोडवर कडवामहू गावानजीक घडला. अपघातात कंडारीतील जगताप पती, पत्नीसह अाईचा मृत्यू झाला अाहे. मृतांमध्ये एक जण चाळीसगावचा आहे.

कंडारी (ता. भुसावळ) येथील सोनार कुटुंब हे अहमदाबादकडे लग्नासाठी तवेरा (एम एच २० सीएस ८१२०) गाडीने जात होते. सकाळी सात वाजता अक्कलकुव्याच्या पुढे समोरून भरधाव येणाऱ्या ट्रक (जी.जे. ०७ वाय १८८४)ने तवेराला जोरदार धडक दिली. या अपघातात तवेराचा चक्काचूर झाला. गाडीतील भारती रवींद्र जगताप (२८, रा. कंडारी) संतोष श्रीधर मोरे ऊर्फ सोनार (५०, रा. चाळीसगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रवींद्र मधुकर जगताप (४८), सुमन मधुकर जगताप (७०) चालक यशवंत ऊर्फ पिंटू फालक (४५, सर्व रा. कंडारी ता.भुसावळ) यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघातात गणेश रघुनाथ वानखेडे (४५), सुरेखा गणेश वानखेडे (४०, दोन्ही रा. पिळोदा, ता.यावल), हितेश रवींद्र जगताप (८), जयेश रवींद्र जगताप (१२), कृतिका संतोष सोनार (२२) मनीषा संतोष सोनार (४५, सर्व रा.चाळीसगाव) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, नंदुरबार, कंडारी, पाचाेरा येथील नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

प्रवासाचे नियाेजन बदलणे...
अपघातातत्यांची पत्नी मनीषा मुलगी दीपिका हेदेखील जखमी झाले अाहेत. त्यांच्यावर अक्कलकुवा येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. संताेष माेरे सुवर्णकार कारागीर हाेते. त्यांचे शेजवळकरनगरात स्वत:चे घर असून, त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.

मनीषा संतोष सोनार (४५, सर्व रा.चाळीसगाव) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, नंदुरबार, कंडारी, पाचाेरा येथील नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

पुढील स्लाइडवर वाचा, मृतांमधील तिघे जगताप कुटुंबातील