आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करवाढीचा अर्थसंकल्प सादर करण्याची लगबग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेत अर्थसंकल्पाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. अर्थ विभागात अधिका-यांच्या बैठकांचा सपाटा सुरू असून प्रस्तावित अर्थसंकल्पात खासगी भूखंडांवरील करवाढीसह उत्पन्न वाढीसाठीचा प्रस्ताव दिला जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेचा गेल्या वर्षाचा अर्थसंकल्प सुमारे ७१९ कोटींचा मंजूर करण्यात आला होता. महापालिकेचे वार्षिक उत्पन्न सुमारे १०० ते ११० कोटींचे असले तरी आगामी योजनांसाठीही तरतूद करण्यात येते. सध्या पालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे आगामी काळात पालिकेचे उत्पन्न कसे वाढेल? यादृष्टीने प्रशासन विचार करीत आहे. त्यामुळेच खासगी भूखंडावरील करात वाढ करणे यासह शहरातील पालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीचा स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

अधिका-यांची बैठक
पालिकेचाअर्थसंकल्प २० फेब्रुवारीपर्यंत स्थायी समिती समोर सादर करता आल्यास प्रशासनाला करवाढ सुचवता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन पालिका आयुक्त संजय कापडणीस, उपायुक्त अविनाश गांगोडे, मुख्य लेखापरीक्षक सुभाष भोर, मुख्य लेखाअधिकारी चंद्रकांत खरात यांच्यासह प्रमुख अधिका-यांची शनिवारी बैठक घेतली. या बैठकीत अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मुदतीत सादर करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या.