आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचवीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सावखेडा शिवारातील ब.गो.शानभाग माध्यमिक विद्यालयातील पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गणिताच्या शिक्षकाला पालकांनी शुक्रवारी शाळेतच चांगला चोप दिला. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी मुख्याध्यापक तालुका पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.
ब.गो.शानभाग विद्यालयात शिक्षक नितीन चौक हा गणित शिकवतो. त्याने यापूर्वीही पीडित विद्यार्थिनीशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत विद्यार्थिनीने पालकांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावरून तिच्या पालकांनी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे तोंडी तक्रार केली होती, तरीही हा प्रकार थांबला नाही. तसेच त्याने दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याने अखेर त्याला शुक्रवारी पालकांनी चोप देऊन लेखी तक्रार दिली.

अनेक मुलींसोबत लगट केल्याची तक्रार
^पीडित मुलीचे पालक तक्रार देण्यासाठी आले होते. त्यांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार दिलेली आहे. शिक्षकाच्या या कृत्याबाबत संस्थेची बैठक घेऊन त्यात शिक्षकावर कारवाईचा निर्णय घेणार आहेत. शिक्षक चौक हा नेहमीच शाळेतील मुलींशी लगट करतो. यापूर्वीही त्याने अनेकवेळा हा प्रकार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सागरशिंपी, तपासअधिकारी, तालुका पोलिस ठाणे

कारवाईचा निर्णय संस्था घेणार
^शिक्षक नितीन चौक याने मुलींचा लैंगिक छळ केल्याबाबत पालकांनी यापूर्वी तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र, शुक्रवारी लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे. त्याच्यावर कारवाई करण्याबाबतचा निर्णय संस्था घेणार आहे. ज्ञानेश्वर पाटील, मुख्याध्यापक,ब.गो.शानभाग माध्यमिक शाळा