आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाची आत्महत्या; एकाविरुद्ध गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिवराणानगरात राहणाऱ्या ४० वर्षीय शिक्षकाच्या मृत्यूप्रकरणी चांदसर येथील एका व्यक्तीवर अात्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात अाला आहे.
शिवराणानगरातील रहिवासी प्रदीप सुरेश जोशी (वय ४०) या शिक्षकाला पाळधी येथील दुकान विक्रीच्या कारणावरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चांदसर येथील देवेंद्र विलास पवार (वय ३५) याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासगी आयटीआयमध्ये शिक्षक असलेले प्रदीप जोशी यांनी सप्टेंबर रोजी स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याबाबत संशयास्पद मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी माधवी जोशी यांनी रविवारी रामानंद पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले अाहे की, माझ्या पतीने सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपी देवेंद्र पवार याने पाळधी येथील दुकान नावावर करून घेण्यासाठी मानसिक त्रास दिला अाणि माझ्या पतीला आत्महत्या करण्यात भाग पाडले. या आशयाच्या फिर्यादीवरून चांदसरच्या देवेंद्र पवार याच्याविरुद्ध रामानंदनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...