आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांच्या 14 सुट्यांवर गंडांतर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या शाळांमधील शिक्षकांचा 14 सुट्या कमी करण्यात आल्या आहेत. आता शिक्षकांना 90 ऐवजी 76 सुट्या मिळणार असून, त्यात 44 उन्हाळी सुट्या असतील.

शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षभरात शिक्षकांना 90 सुट्या मिळाल्या होत्या. परंतु शिक्षण संचालकांच्या नवीन आदेशानुसार सुट्या कमी झाल्या. येत्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 16 जूनपासून होईल. पहिले सत्र 19 ऑक्टोबरपर्यंत असेल. तर दुसरे सत्र 7 नोव्हेंबर ते 30 एप्रिलपर्यंत राहील. दिवाळीची सुटी 20 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर यादरम्यान असेल. त्यामुळे यंदा दिवाळीत 16 सुट्या असतील.