आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्याध्यापिकेकडून छळ; शिक्षकाची शाळेत आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - मुख्याध्यापिकेच्या जाचापायी पालिकेच्या शाळेतील शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी हा प्रकार उघड झाला. शिक्षकाने लिहून ठेवलेली चिठ्ठी हस्तगत करण्यात आली आहे.

जामनेर रोडवरील शाळा क्र. 35 मधील शिक्षक महेंद्रसिंह प्रल्हादसिंह शिसोदिया (44) यांच्याकडे तहसील खात्याने बीएलओचे अतिरिक्त काम सोपवले होते. रविवारी सुटी असूनही ते या कामासाठी शाळेत आले होते. महेंद्रसिंह यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
‘मुख्याध्यापिका सुनंदा मधुकर पवार सूडबुद्धीने वागवत असत. पुरुष शिक्षक असल्याने सर्व कामे तुम्हालाच करावी लागतील, अशी तंबी त्या देत. त्याच माझ्या आत्महत्येला जबाबदार आहेत. 2008 पासून प्रामाणिकपणे काम करूनही मला कारवाईच्या धमक्या दिल्या जात होत्या,’ असे महेंद्रसिंह यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.