आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teacher Suspended In The Case Of Showing Sex Video

विद्यार्थिनींना अश्लील क्लिप दा‌खवणारा शिक्षक निलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पाराेळा तालुक्यातील शेळावे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींना शिक्षकाने अश्लील चित्रफीत दाखवण्याचा घृणास्पद प्रकार मंगळवारी उघडकीस अाला हाेता. यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून याप्रकरणी शिक्षकावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली हाेती. तर, याप्रकरणी जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी शनिवारी संबंधित शिक्षकाला निलंबित केल्याचे अादेश काढले अाहेत.

शेळावे बुद्रूक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक देविदास मणिलाल साैपुरे हा चाैथीच्या वर्गातील विद्यार्थिनींना अश्लील चित्रफीत दाखवित असे. याबाबतची माहिती विद्यार्थिनींनी पालकांना सांगितल्यानंतर हा घृणास्पद प्रकार उघडीस आला हाेता. या प्रकरणी मंगळवारी गटशक्षणािधकाऱ्यांनी त्या शिक्षकावर कारवाई करणे अपेक्षित हाेते. मात्र, त्यांनी याचा चाैकशी अहवाल बुधवारी शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांच्याकडे पाठवला हाेता. त्यानंतर शनिवारी सीइअाे पांडेय यांनी साैपुरे यांच्या निलंबनाचे अादेश काढले अाहेत.

काय अाहे अादेश?
निलंबनकाळात शिक्षक साैपुरे हे एरंडाेल मुख्यालयी हजर राहतील. या काळात त्यांनी मुख्यालय साेडू नये, मुख्यालय साेडताना गटशिक्षणािधकाऱ्यांची परवानगी घ्यावी, तर या काळात काेणताही व्यवसाय अन्य नाेकरी करू नये. तसे अाढळल्यास प्रशासकीय कारवाई हाेईल.