आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न: वेतनासाठी अांदाेलन करताना घेतले विष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थकीत वेतनासाठी जळगाव महापालिकेत अांदाेलन करताना विष घेतलेल्या डॉ. शफीक यांना इतर शिक्षकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले - Divya Marathi
थकीत वेतनासाठी जळगाव महापालिकेत अांदाेलन करताना विष घेतलेल्या डॉ. शफीक यांना इतर शिक्षकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले
जळगाव- थकीत वेतनासाठी महापालिका शिक्षकांचे बुधवारी थाळीनाद आंदोलन सुरू असतानाच दुपारी १२ वाजेच्या सुमारास ‘मेरे मरने को आयुक्त साहब जिम्मेदार रहेंगे...’ म्हणत एका शिक्षकाने महापालिकेच्या पहिल्या मजल्यावर विषप्राशन करून अात्महत्येचा प्रयत्न केला. या शिक्षकावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.
थकीत वेतनासाठी पालिकेच्या २१४ शिक्षकांसह निवृत्त शिक्षकांचे १५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांवर ईद येऊनही तोडगा निघत नसल्याने उर्दू शाळा क्रमांक १० मधील शिक्षक डॉ. शफीक नाजीम सय्यद यांनी पालिकेच्या पहिल्या मजल्यावर लिफ्टच्या दरवाज्याजवळ विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. क्षणात ते खाली पडले व ताेंडातून फेस येऊ लागला. त्यामुळे घाबरलेल्या इतर शिक्षकांनी तातडीने डाॅ. शफीक यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. आपल्या मृत्यूला शिक्षक संघटना नव्हे, तर आयुक्तच जबाबदार असल्याची चिठ्ठीही त्यांनी लिहून ठेवली आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त शिक्षकांनी दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या पालिकेच्या महासभेकडे वळून हल्लाबोल केला. मात्र कर्मचाऱ्यांनी आतून हाॅलचे प्रवेशद्वार घट्ट बंद करून शिक्षकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिक्षकांनीही बाहेरून प्रवेशद्वार लोटण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांचा संताप अधिकच अनावर झाल्याने मनपा अधिकारी व पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिक्षकांना खाली प्रवेशद्वाराजवळ जाऊन आंदोलन करा, असे सांगितले. तेथून माघारी फिरलेल्या शिक्षकांनी पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन केले. आयुक्त व पदाधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.
बातम्या आणखी आहेत...