आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक पुरस्कार : आयुक्तांच्या निर्णयानंतर झाली पुरस्कारांची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पाचोरा तालुक्यातील शिक्षकाला निवड समितीने पात्र ठरवले. मात्र, त्याच्यावर असलेल्या गुन्ह्यामुळे ते निकषात अडकले. हे शिक्षक गुन्ह्यातून निर्दोष सुटल्यामुळे स्थानिक पदाधिकाºयांचा त्याच्याच नावावर जोर होता. अखेर विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्ह्यातील 15 शिक्षकांची यादी अंतिम करण्यात आली, आणि शेवटी त्याच शिक्षकांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला.
शिक्षकदिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित केले जातात. जिल्ह्यातून 15 शिक्षकांना गुरुवारी सकाळी 11 वाजता जिल्हा बँकेच्या सभागृहात पुरस्कार वितरित करून गौरविण्यात येणार आहे. अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आदर्श शिक्षकांची निवड केली. पाचोरा तालुक्यातील वडगाव खुर्द येथील रघुनाथ पाटील यांच्या नावावर समितीने शिक्कामोर्तब केला. मात्र, या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला असल्याने ते निकषात बसत नव्हते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटील यांनी अध्यक्षांकडे याच नावाचा आग्रह धरला होता. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.


पुरस्कार्थी असे
विठ्ठल पाटील (नगाव, ता. अमळनेर), नीना सोनवणे (जामठी, ता. बोदवड), प्रवीण पाटील (कजगाव, ता.भडगाव), नितीन पाटील (बोहाडी खुर्द, ता. भुसावळ), राजेंद्र पाटील (पिंपरखेड तांडा, ता. चाळीसगाव), भास्कर पाटील (हातेड, ता. चोपडा), योगेश पाटील (कंडारी बुद्रूक, ता. धरणगाव), प्रशांत जाधव (टोळी, ता. एरंडोल), जिजाबराव बाविस्कर (भोकर, ता. जळगाव), सुनीता बिरहारी (शहापूर, ता. जामनेर), भास्कर लहासे (मुक्ताईनगर), रघुनाथ पाटील (वडगाव खुर्द, ता. पाचोरा), वैशाली बोरसे (वाघरा-वाघरी, ता. पारोळा), निर्मला अवसरमल (ऐनपूर, ता.रावेर), रिता पाटील (अंजाळे, ता. यावल).


पर्यायी दोघांची नावे पाठवली
हे शिक्षक गुन्ह्यातून निर्दोष सुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर निवड समितीने प्रत्येक तालुक्यातून एक आणि पाचोरा तालुक्यातून दोन नावांची शिफारस केली. यात कुराड येथील वैशाली पाटील यांचेही नाव पर्याय म्हणून विभागीय आयुक्तांकडे पाठवले होते; मात्र रघुनाथ पाटील यांचेच नाव निश्चित झाले. या खटाटोपामुळे बुधवारी सायंकाळपर्यंत यादी निश्चित झालेली नव्हती.

स्थानिक पदाधिकाºयांमध्ये वाद नसून गुन्ह्यामुळे तसेच निकषामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या शिक्षकाचे काम चांगले होते आणि तो गुन्ह्यातून निर्दोष सुटला होता. प्रशासकीय अडचणीमुळे तालुका पुरस्कारापासून वंचित राहू नये म्हणून दोघांची नावे पाठवली.
दिलीप खोडपे, अध्यक्ष, जिल्हा परिषद