आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकदिनी विद्यार्थ्यांनी सांभाळला शाळेचा कारभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील विविध शाळा, महाविद्यालयात शुक्रवारी माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांची जयंती शिक्षकदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त शिक्षकांची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडली. तसेच शाळेचे विविध कामकाजदेखील त्यांनी उत्कृष्टपणे सांभाळले. लाठीविद्यालय : भा.का. लाठी विद्यामंदिरात शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. पालक शिक्षक संघातर्फे शिक्षक कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रवीण बारी हे अध्यक्षस्थानी होते.
शिक्षणशास्त्रमहाविद्यालय : शिरसोलीयेथील जय दुर्गा भवानी मंडळाच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात नवोपक्रम केला. यात शिक्षकांसाठी आरोग्य, योगसाधना करण्यात आली. प्रा. अर्चना भोसले या वेळी अध्यक्षस्थानी होत्या.
विद्याइंग्लिश स्कूल : विद्याइंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. राजेंद्र राजपूत यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नूतनमराठा : नूतनमराठा महाविद्यालयात एनएसएसतर्फे प्राध्यापकांचा सत्कार झाला. रासेयोचे कार्यक्रम अधिकारी पी.व्ही. बाविस्कर, प्रा. ए.बी. वाघ आदी उपस्थित होते.
जी.डी.बेंडाळे:जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींनी वेळापत्रकाप्रमाणे तासिका घेतल्या. या वेळी विद्यार्थिनींनी शिक्षकांची भूमिका पार पाडली.
शिक्षणशास्त्रविद्यालय : ज.जि.विद्याप्रसारकसहकारी संस्था संचलित शिक्षणशास्त्र विद्यालयात शिक्षकांचे कामकाज विद्यार्थ्यांनी पार पाडले. प्राचार्य यांची जबाबदारी सोहेल खाटीक यांनी सांभाळली. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य एस.डी. सोनवणे या होत्या. भगीरथ शाळेत विद्यार्थ्यांना शिकवताना विद्यार्थिनी योगिनी कांबळे.