आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांनी अाजच्या शिक्षणप्रणालीनुसार अपडेट व्हावे : कुलगुरू पी. पी. पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : खान्देशातील विद्यार्थ्यांमध्ये क्षमता असून त्यांना दिशा देण्याचे काम प्राध्यापकांकडून व्हावे, त्यातच कौशल्य विकसित होण्यासाठी मुलांना त्या पद्धतीने शिक्षण मिळणे गरजेचे आहे. अाजच्या शिक्षणप्रणालीनुसार शिक्षकांनी अपडेट व्हावे, असे मत उमविचे कुलगुरू डाॅ. पी. पी. पाटील यांनी व्यक्त केले. खान्देश काॅलेज अाॅफ एज्युकेशन सोसायटीतर्फे मू.जे.महाविद्यालयात शनिवारी कुलगुरू डाॅ. पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमाचे अायाेजन केले हाेते.

अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. अार.एस.माळी तर प्रमुख पाहुणे म्हणून भरत अमळकर तसेच संस्थाध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, माजी प्राचार्य प्रा. डी. एस. नेमाडे, अनिल राव, मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य उदय कुळकर्णी उपस्थित हाेते.
 
प्रास्ताविक अनिल राव यांनी केले. या वेळी शाल, श्रीफळ अाणि स्मृतीचिन्ह देऊन कुलगुरूंचा सत्कार करण्यात अाला. प्राचार्य अविनाश काटे यांच्यातर्फे कुलगुरूंचे स्केच भेट स्वरुपात देण्यात अाले. सूत्रसंचालन भाग्यश्री भलवतकर तर अाभार उदय कुळकर्णी यांनी मानले. 
 
स्किलबेस्ड् शिक्षण : बेंडाळे 
शिक्षकाने विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून जगायला हवे, नवीन विद्यापीठ कायदा अाणि त्यामुळे विद्यापीठात कराव्या लागणाऱ्या बदलांमुळे अाज नवीन कुलगुरूंपुढे अाव्हाने उभी अाहेत. शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असून अापल्या भागातील मुलांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हायला हवा. मुलांना कौशल्यावर आधारित शिक्षण देणे आवश्यक आहे, असे बेंडाळे यांनी या वेळी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...