आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात शिक्षकांची स्वखर्चातून स्कूल बससेवा, खेडीतील सद‌्गुरू विद्यालयातील सात शिक्षकांचा अनोखा उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सर्वसाधारणपरिस्थितीतून आलेल्या सात शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य करताना सामाजिक वसाही जोपासला आहे. स्वखर्चातून मोफत स्कूल बससह शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करीत आहेत. प्रसिद्धीचा बडेजाव करता तब्बल १० वर्षांपासून अखंडपणे हा उपक्रम राबवणारे शिक्षक खऱ्या अर्थाने दीपस्तंभच आहेत.

जळगाव शहरातील खेडीतील सद‌्गुरू प्राथमिक विद्या मंदिर ही शाळा अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपलीशी वाटू लागली आहे. शाळेतील विद्यार्थी एमआयडीसी किंवा जवळपासच्या खेड्यातील होते. त्यांच्या येण्या-जाण्याची समस्या होती. यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ.नारायण खडसे यांनी स्कूल बस उपलब्ध करून दिली परंतु या स्कूल बसच्या खर्चाची जबाबदारी शिक्षकांनी आपल्या खाद्यांवर घेतली. स्कूल बसचालक आणि डिझेलचे पैसे शिक्षक देऊ लागले. यासाठी महिन्याला ३५ ते ३८ हजार रुपये खर्च त्यांना येत आहे. असूनहा खर्च सात शिक्षक करीत आहेत. पहिली ते दहावीपर्यंत असणाऱ्या या शाळेत ३७६ विद्यार्थी आहेत.

शाळेत येणारे सर्वच विद्यार्थी दुर्बल घटकातील. त्यांना गणवेश, बुट, दप्तर आणि शैक्षणिक साहित्य पुरवण्याची जबाबदारीही शिक्षकांनी घेतली. यासाठी जवळपास एक लाख रुपये खर्च ते करीत आहेत. सर्व शिक्षक मिळून स्कूल बस साहित्य वाटपासाठी वर्षाला साडेतीन ते चार लाख रुपयांचा खर्च आपल्याच पगारातून करत आहे. मुख्याध्यापिका गायत्री भंगाळे शिक्षक लीलाधर नारखेडे, शिल्पा झोपे, गणेश लोडते, भूषण जोगी, जावेद तडवी, पूनम चौधरी हे काम गेल्या १० वर्षांपासून करीत आहेत.

सद‌्गुरू विद्यालयातील याच सात शिक्षकांनी स्कूल बसचा उपक्रम सुरू केला आहे.
एका विद्यार्थ्यास घेतात दत्तक आई-वडिलांचेछत्र हरवलेले, गरिबीमुळे शिक्षण घेऊ शकणाऱ्या एका विद्यार्थ्यास एक शिक्षक दरवर्षी दत्तक घेतात. प्रत्येक वर्षी एक विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी हे शिक्षक उचलत आहेत.

गुरूंचालौकिक वाढवला
शिक्षकसंघटनांचे राजकारण, हक्क पगारासाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांपेक्षा खेडीतील या शिक्षकांनी वेगळा आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे. या शाळेतील एकही शिक्षक खासगी शिकवणीसुद्धा घेत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या गुरूंबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...