आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडक्या छताखाली शिक्षकांना प्रशिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील शिक्षकांना दुस-या टप्प्यातील प्रशिक्षण मंगळवारी देण्यात आले. मात्र, ज्या इमारतीत हा प्रशिक्षण वर्ग झाला, त्याच इमारतीचे छत पडके असल्याने उपस्थित शिक्षकांच्या चेह-यावर नाराजी दिसून आली.

या प्रशिक्षण वर्गात विद्यार्थी व शाळांची गुणवत्ता उंचावणे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसवणे याबाबत मार्गदर्शन केले जाते.
मंगळवारी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 150 व पालिकेच्या 90 अशा 240 शिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शक विलास तायडे, प्रेमराज तायडे, अक्रम शेख मिर्झा, प्रशांत पाटील, अरुण पाटील, केंद्रप्रमुख संजय श्रीखंडे, रवींद्र तिडके व अशोक तायडे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी गटशिक्षणाधिकारी ठाकरे, शिक्षणविस्तार अधिकारी चव्हाण, म्हसकर उपस्थित होते. मात्र, सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ज्या द.शि.विद्यालयाच्या वर्गखोलीत प्रशिक्षण वर्ग झाला, त्या खोलीचे पडके छत पाहून शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.