आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचे प्रशिक्षण अाता ऑनलाइन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण यंदा प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यभरात एकाचवेळी हे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाणार आहे. त्यामुळे आता राज्यावरून जिल्हा आणि जिल्ह्यावरून तालुकास्तरावर दिली जाणारी प्रशिक्षणाची साखळी पद्धत बंद होणार आहे.

पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांची पाठ्यपुस्तके बदलण्याचा निर्णय पाठ्यपुस्तक महामंडळाने घेतला आहे. यात पहिल्या दोन वर्षांत पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गांचा अभ्यासक्रम बदलला. २०१५-१६ या वर्षात पाचवीच्या वर्गांचा अभ्यासक्रम बदलणार आहे. अभ्यासक्रम बदललेल्या वर्गांच्या शिक्षकांना शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदर पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते. तेप्रशिक्षण यंदा प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन होणार आहे. पुणे येथून एकाचवेळी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. २२ ते ३० एप्रिलदरम्यान मराठी माध्यमांच्या शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जाईल. तर इतर माध्यमांच्या शिक्षकांना ते १० जूनदरम्यान हे प्रशिक्षण होईल. राज्यभरात याबाबतची चाचपणी सुरू असून ऑनलाइन प्रश्नोत्तरेदेखील विचारता येणार आहे.
अशीअसेल नवी पद्धत : शासनाच्यापुणे येथील मुख्य कार्यालयातून हे प्रशिक्षण तज्ज्ञांच्या माध्यमातून दिले जाईल. यासाठी मुंबई आयआयटीच्या माध्यमातून एव्हीयू नावाचे सॉप्टवेअर तयार केले आहे. ते प्रत्येक जिल्ह्यात निर्मिती केलेल्या केंद्रांवर कॉम्प्युटरमध्ये अपलोड केले जाईल. मोठी स्क्रीन, वेब कॅमेऱ्यासह अन्य अत्याधुनिक यंत्रणा उभारली जाणार आहे.
जुनीपद्धत अशी : ज्यावर्गांचा अभ्यासक्रम बदलणार त्या शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी राज्यस्तरावर पुणे येथे होणाऱ्या प्रशिक्षणात डाएटचे प्राध्यापक सहभागी होतात. त्यांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर प्रशिक्षण दिले जाते आणि जिल्ह्यावर प्रशिक्षित झालेले तज्ज्ञ शिक्षक तालुकास्तरावरील शिक्षकांना प्रशिक्षण देतात.

ऑनलाइनमुळेशासनाचा मोठ्या प्रमाणात निधीची बचत होणार आहे. तसेच राज्यावर प्रशिक्षण घेऊन आलेले तज्ज्ञ जिल्ह्यावर आणि जिल्ह्यावरील तज्ज्ञ तालुकास्तरावर प्रशिक्षण देतात. यातून पूर्णपणे कंटेन्ट पोहोचत नाही. त्यामुळे डाएट या प्रशिक्षणाची जबाबदारी हाताळेल. डॉ.आय.सी. शेख, प्राचार्य- डाएट