आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team Thespo14 Audition Test At Jalgaon In Frist Time

'थेस्पो' महोत्सवासाठी प्रथमच जळगावात निवड चाचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पृथ्वी थिएटरअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर ‘थेस्पो महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रविवारी शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात भुसावळच्या नाहाटा महाविद्यालय नाट्यशास्त्र विभागाची निवड चाचणी घेण्यात आली. यात सहभागी कलावंतांनी लीना बोरनारे लिखित दिग्दर्शित ‘वद जाऊ कुणाला शरण’ हे नाटक सादर केले.

या महोत्सवाचे यंदा १६ वे वर्ष असून यात देशातील विविध १० भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रांतातील नाटके सादर केली जाणार आहेत. नाहाटा महाविद्यालयाच्या या नाटकाची निवड झाल्यास महोत्सवात हे नाटक सादर करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. यानंतर थिएटरतर्फेच नाटकाचे संपूर्ण भारतभर प्रयोग आयोजित केले जातील. महाविद्यालयातर्फे ‘वद जाऊ कुणाला शरण’ हे नाटक निवड समितीसमोर सादर करण्यात आले. थिएटरचे सागर घोलप, शॉन विल्यम्स आणि दिव्येश विजयकर यांनी या नाटकाचे परीक्षण करून सहभागी विद्यार्थ्यांना थिएटरचे बारकावे सांगितले. या नाटकात गणेश पाटील, हृषिकेश सोनवणे, रेणुका देशपांडे, माधुरी शिवपुजे, अमोल ठाकूर, प्रदीप भोई, गुणवंत महाजन हृषिकेश पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यांना नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. दिलीप देशमुख वैभव मावळे यांचे मार्गदर्शन लाभले.
खान्देशातून प्रथमच सहभाग
पृथ्वी थिएटरमध्ये अनेक सुप्रसिद्ध कलावंतांचा सहभाग असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाची नाटके यात सादर केली जातात. खान्देशातून आजपर्यंत या निवड चाचणीत कोणीही सहभागी झालेले नाही. अर्ज भरल्यानंतर थिएटरचे लोक संबंधित शहरात जाऊन नाटकाचे परीक्षण करतात. तसेच काही आवश्यक बदल सूचवतात. या थिएटरचे काम सध्या संजना कपूर सांभाळतात.