आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Techers Congratulation By Energy Is Permanent Student!

पाठीवरची थाप विद्यार्थ्यास कायम ऊर्जा देणारी ठरते!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सिखवाल मंचतर्फे गाैरवण्यात अालेले दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणवंत. )
जळगाव - जळगाव सिखवाल मंचतर्फे १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच झाला. अध्यक्षस्थानी पद्मावती व्यास हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बी.जी.तिवारी, उषा सिखवाल, दुर्गाबाई तिवारी, सरला तिवारी उपस्थित होते.
या वेळी सिखवाल यांनी मुलांना अभ्यासारोबरच आपल्या शारीरिक सुदृढतेकडेही लक्ष द्या, आपले चारित्र्य सांभाळा. समाजाप्रती बांधिलकी ठेवत समाजसेवा करा असे सांगितले. प्रा. सुरेश पांडे यांनी सूत्रसंचालन केले. तर महेश ओझा यांनी आभार मानले. यासाठी प्रदीप जोशी, नंदकुमार उपाध्ये, सूरज नागला, हेमंत व्यास, संजय व्यास, गजानन शिंदे यांचे सहकार्य मिळाले
विद्यार्थ्यालापाठीवर दिलेली थाप ही कायम ऊर्जा देणारी असते. स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी शॉर्टकट उपयोगाचा नाही. शाळा ही प्रयोगशाळा असून त्यात वेगवेगळे प्रयोग करून शिकविते म्हणून आयुष्यभर हा ठेवा जपा, असे मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. उदय कुळकर्णी यांनी सांगितले.

शिक्षण प्रसारक मंडळाच्या शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयात बुधवारी शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त गंधे सभागृहात शालांत परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार समारंभ पार पडला. त्या वेळी ते बोलत हाेते. शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रभारी कार्याध्यक्ष अॅड. सुशील अत्रे अध्यक्षस्थानी होते. या वेळी शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयातील प्रथम अक्षय मालपुरे प.न.लुंकड कन्या शाळेची प्रथम विद्यार्थिनी श्रुती विनोद पाटील यांचा ‘सुवर्ण पदक’ देऊन गौरव करण्यात आला. याचवेळी शेठ ला.ना.शाळेातून आलेले पहिले पाच विद्यार्थी अक्षय संजय मालपुरे, वैभव तरटे, पीयूष मधुकर चौधरी, वैभव जाधव, चतुर्थ अनिकेत पाटील, कल्पेश जाधव राधेश्याम पांडे तसेच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापक द.का.देवळे यांनी प्रास्ताविक केले, तर पर्यवेक्षक आर.बी.पाटील यांनी अहवाल वाचन केले. उपमुख्याध्यापिका वैशाली चौधरी यांनी परिचय करून दिला. जे.आर.साळुंखे यांनी पारितोषिक वितरण वाचन, तर एस.एस.पाटील यांनी सूत्रसंचालन आणि व्ही.एल.जगताप यांनी आभार मानले. डॉ. विजय दावलभक्त, सचिव योगिनी बाकरे, प्रेमचंद ओसवाल, लता पाटणकर, डॉ. शरद केळकर, पारसमल कांकरिया, डॉ. शिरीष गर्गे, कंवरलाल संघवी, दिलीप मुथा, प्रा. शरदच्चंद्र छापेकर, स्वाती पवार, रमेश सुरळकर, आर.बी.पाटील, बी.एम.साळुंखे उपस्थित होते.

जळगाव श्रीसंत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठानतर्फे माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ जुलै रोजी मॉर्डन जिम्नॅशियम हॉल पुष्पलता गुळवे मुलींचे विद्यालय स्टेट बँक येथे हा सोहळा होणार आहे. जिल्ह्यातील १०वी, १२वीचे विद्यार्थी, पदवी, पदव्युत्तर, डीएड, बीएड, अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेत ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी १० जुलैपर्यंत विजय महाजन, सिग्मा सेवन कॉम्प्युटर्स पहिला मजला, २६ शाहू महाराज कॉम्प्लेक्स, शरद अनंराव मोरे शरद क्रिएशन्स, सी ३९ दुसरा माळा, गोलाणी मार्केट येथे जमा करावे, असे कळवण्यात आले आहे.
सिखवाल मंचतर्फे गाैरवण्यात अालेले दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणवंत.