आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Technology: Digital Locker Forfronter In Maharashtra

तंत्रज्ञानाची कास: डिजिटल लाॅकरमध्ये महाराष्ट्र अाघाडीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेतून डिजिटल लाॅकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात अाली अाहे. डिजिटल लाॅकर उघडण्यात देशात महाराष्ट्राने अाघाडी घेतली अाहे.
महाराष्ट्र शासनानेही २०१५ हे वर्ष डिजिटलाइज्ड कालबद्ध सेवा वर्ष घाेषित केले अाहे. १ जुलै राेजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल इंडिया वीक(सप्ताह)चे उद्घाटन झाले. डिजिटल लॉकरमध्ये नागरिकांना वेळाेवेळी लागणारे सर्व दाखले जसे जन्म दाखला, अाधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, पासपाेर्ट, शिक्षणविषयक दाखले ठेवण्याची सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही कागदपत्रे संगणकीकृत लाॅकरमधून केव्हाही कोठेही उपलब्ध होऊ शकतात. या सेवेचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रातील नागरिकांनी घेतला आहे. देशभरातील ६ लाख ४५ हजार ७२६ नागरिकांनी डिजिटल लाॅकर सुरू केले अाहे. त्यात महाराष्ट्रातील ७१ हजार ९६१ नागरिकांचा समावेश अाहे. दुस-या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून या राज्यातील ६६ हजार २९४ नागरिकांनी, अांध्र प्रदेशातील ५२ हजार ३९८ नागरिकांनी डिजिटल लाॅकर सुरू केले आहेत.

असे वापरा डिजिटल लाॅकर
जी कागदपत्रं डिजिटल लाॅकरमध्ये ठेवायची अाहेत. ती स्कॅन करून त्याची साॅफ्ट काॅपी लाॅकरमध्ये ठेवता येते. https://digitallocker.gov.in या संकेतस्थळावर गेल्यावर डिजिटल लाॅकर हा पर्याय देण्यात आला आहे. या पर्यायावर क्लिक केल्यावर अाधार क्रमांक विचारला जाताे. ताे दिल्यावर माेबाइलवर एसएमएसद्वारा पासवर्ड दिला जाताे.

ग्रामसभांमधून हाेणार प्रबाेधन
डिजिटलाइज्ड कालबद्ध सेवा वर्ष व डिजिटल इंडिया वीक या उपक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी केंद्र, राज्य सरकारने कालबद्ध कार्यक्रम अाखला अाहे. त्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात येत अाहेत. या सभेत ई-पंचायत अंतर्गत वापरण्यात येणा-या विविध अाज्ञावली, मिळणा-या सेवा, दाखले, विविध याेजनांशी निगडित असलेल्या अाज्ञावली माहिती ग्रामस्थांना दिली जात अाहे.

कार्यक्रमाची सांगड
अाधार कार्ड संलग्नीकरण राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण, प्रमाणीकरण या दाेन्ही कार्यक्रमांची सांगड ‘डिजिटल इंडिया वीक’मध्ये करण्यात आली आहे. याविषयी ग्रामसभेत माहिती देऊन माेठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार आहे.
जयसिंग वळवी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, धुळे