आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Technology : See The Film On 48 Feet High Screen

तंत्रज्ञान : 48 फूट स्क्रीनवर पाहा चित्रपट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - हल्ली सॅटेलाइट प्रक्षेपणामुळे चित्रपटगृहांचे रूपच पालटले आहे. चित्र अधिक सुस्पष्ट व्हावे याकरिता जळगावात आता तब्बल 48 फुटांच्या स्क्रीनवर चित्रपटाचा आनंद जळगावकरांना घेता येणार आहे. एवढय़ा मोठय़ा स्क्रीनचे चित्रपटगृह खान्देशात एकमेव असेल.

एकीकडे चित्रपटगृहांमधील प्रेक्षक कमी होत असून, चित्रपटगृहे बंद पडण्याच्या स्थितीत आहेत, तर दुसरीकडे जळगावकरांसाठी मल्टिप्लेक्स चित्रपटगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यापुढे जाऊन आता हॉलीवूडचे चित्रपटही सॅटेलाइटद्वारे पाहण्याची सोय येथील प्रेक्षकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशिष्ट चित्रपट चित्रपटगृहात पाहण्याचा आनंद काही औरच असतो. त्यामुळे ठरावीक अभिनेत्यांचे चित्रपट थिएटरमध्येच पाहिले जातात. त्यामुळे अशा चित्रपटांना जेमतेम तीन-चार दिवस प्रतिसाद मिळतो; मात्र त्यानंतर गर्दी ओसरते. अशी काहीशी स्थिती सध्या चित्रपटगृहांची आहे; पण याउलट जळगावकरांना मुंबई, पुणे आणि नाशिकसारख्या मोठय़ा शहरांप्रमाणे मल्टिप्लेक्स थिएटरची सुविधा मिळत आहे.


स्क्रीनप्रमाणे हायटेक साउंड सिस्टीम उपलब्ध
विशेष म्हणजे, एवढय़ा मोठय़ा स्क्रीनवर चित्रपटातील दृश्य अगदी स्पष्ट दिसणार आहे. त्यातच 7.1 डॉल्बी सिस्टीमचा आवाज आणि चित्रपटाच्या स्पष्टतेमुळे खर्‍या अर्थाने चित्रपट पाहण्याचा आनंद लुटता येईल. स्क्रीननुसार प्रेक्षागृहात 28 स्पीकर आणि आठ हुपर बसवण्यात आले आहेत. यापूर्वी चित्रपटगृहांमध्ये 5.1 डॉल्बी सिस्टीमवर चित्रपट दाखवला जात असे.


नटवर थिएटरमध्ये उपलब्ध सुविधा
आतापर्यंत चित्रपटगृहांतील स्क्रीन 18 बाय 36 फूट एवढी होती. त्यानंतर ती 18 बाय 42 फूट केली गेली; परंतु त्यातील 36 फुटांपर्यंतच्या स्क्रीनवरच चित्रपट दाखवला जात होता. यापुढे प्रेक्षकांना 20.7 बाय 48 फुटांच्या स्क्रीनवर चित्रपट पाहता येणार असून नटवर थिएटरमध्ये तशी सुविधा उपलब्ध झाली आहे.

मोठय़ा शहरांप्रमाणे मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांतील चित्रपटांचा आनंद प्रेक्षकांना मिळावा म्हणून ही सुविधा उपलब्ध करून दिली असून, येत्या 1 नोव्हेंबरपासून नवीन थिएटरमध्ये तिचा शुभारंभ होणार आहे. ‘क्रिश-3’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बी.जी.नेवे, व्यवस्थापक, नटवर थिएटर