आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टेकझिलॉट’मध्ये लागणार विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा कस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी होणार्‍या ‘टेकझिलॉट’ या तांत्रिक स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कौशल्यासह बुद्धिमत्तेचा चांगलाच कस लागणार आहे. सुमारे दोन हजार विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

भुसावळातील संत गाडगेबाबा अभियांत्रिकीत पाच वर्षांपासून टेकझिलॉट स्पर्धा होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांना तोंड देण्याआधी विद्यार्थ्यांना आपले तांत्रिक कौशल्य आजमवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा स्पर्धेचा मुख्य हेतू असतो. यंदा बग बँग, पी.सी.असेब्लिंग, पेपर-पोस्टर्स सादरीकरण, रोबो रेस, रोबो वॉर, लाइन ट्रेसर, ब्रीज द गॅप आणि क्वीझ या प्रकारात अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांचे कसब दाखवतील. सर्वाधिक आकर्षण ‘रोबो वॉर’चे आहे. याशिवाय डेथ रेस विभागात ‘रोबो रेस’ होईल. शनिवारी सकाळी 9 वाजता वरणगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डी.के.महाजन यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, अकॅडमीक डीन प्रा.आर.जी.बारजीभे उपस्थित राहणार आहेत.