आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी कृत्यांमध्ये ‘टीनएजर्स’चा वाढताेय सहभाग, अशा अाहेत विविध घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरात गेल्या महिनाभरात वेगवेगळ्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये टीनएजर्सचा माेठ्याप्रमाणात सहभाग दिसून येत अाहे. यात उच्चभ्रू घरातील मुलांचाही सहभाग आहे. याप्रकारामुळे संबंधित मुलांचे पालक पोलिसांचा ताण वाढला अाहे. पालकांनी अापला मुलगा काय करताे, याविषयी अाता सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली अाहे. 

शहरात गेल्या काही दिवसांपासून बाजारात गर्दीच्या ठिकाणी मोबाइलची चोरी करणे, सोशल मीडियाचा गैर वापर करून घरफोडी, मद्यसेवन करून सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालण्याचे प्रकार उघडकीस येत अाहे. 

मित्रांच्या कट्ट्यावर होणाऱ्या किरकोळ वादातून थेट गुन्हेगारी कृत्य करण्याचे प्रकारही समोर आले आहेत. पैशांच्या वादातूनही उच्चभ्रू घरातील मुले चोरीसह विविध व्यसनांच्या आहारी जात असल्याचे अनेक उदाहरणे पोलिस ठाण्यांपर्यंत येऊन पोहचत आहेत. मुले अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनाही कठोर कारवाई करता येत नाही. त्यामुळे पाेलिस पालकांना बाेलावून मुलांना समज देऊन संबंधित प्रकरणे मिटवत अाहे; पण हा प्रकार गंभीर असून पालकांनी वेळीच मुलाला गैरमार्गापासून दूर करणे गरजेचे अाहे. 

अशा अाहेत विविध घटना 
केस नंबर 1 : दारूपिऊन धिंगाणा घालत सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री शिरसोली नाका परिसरात घडली आहे. दोन अल्पवयीन मुलांनीच हे कृत्य केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. या दोघांना डीपीवरील कटआऊट रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 
केस नंबर 2 : कॅमेरा विक्रीमध्ये झालेल्या व्यवहारातील पाच हजार रुपये देण्यास मित्रांने विलंब केल्यामुळे एकाने चक्क सुपारी देऊन चौघांच्या मदतीने मित्राचाच मोबाइल कॅमेरा चोरी केल्याची घटना ११ जुलै रोजी घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेने यातील चारही संशयितांना २८ अॉगस्ट रोजी अटक केली. यात धवल खडके, किरण हटकर या दोघांसह दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले.

 
केस नंबर 3: महिनाभरापूर्वी आदर्शनगरातील अकारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या दोन मुलांनी यू ट्यूबवरून चोरी करण्याचे व्हिडिअाे पाहून कुलूप कापण्याचे कटर चक्क ऑनलाइन शॉपिंगने मागवले हाेते. त्या कटरच्या मदतीने त्यांनी सलग दोन रात्रीतून रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन दुकाने फोडली. यातून त्यांना कोणताही आर्थिक लाभ घेण्याचा उद्देश नव्हता. केवळ यू ट्यूबवर दाखवल्याप्रमाणे आपणही चोरी करू शकतो हा प्रयोग त्यांनी केला होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्यांना पकडले होते. 
बातम्या आणखी आहेत...