आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिनएजर्सची टवाळखोरी; शिक्षक, पोलिस हैराण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाविद्यालये, खासगी क्लासेस, सार्वजनिक ठिकाणांवरील टिनएजर्सच्या कट्यांमुळे शिक्षक आणि पोलिस दोघेही हैराण झाले आहेत. शुक्रवारी घडलेल्या अपहरणनाट्यानंतर दुस-या दिवशी निर्भया पथकाने शाळा, महाविद्यालये, मेहरूण तलाव, खान्देश सेंट्रल परिसरात गस्त घालून टवाळखोरांना पिटाळले. मात्र या टवाळखोरांमुळेच शहरात मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

कोल्हे हॉस्पिटल परिसरात शुक्रवारी अल्पवयीन मुलगी आिण तरुणाने चारचाकीतून अपहरण होत असल्याचे नाट्य रंगवले. या घटनेमुळे सुमारे तासभर परिसरातील नागरिकांसह पोलिसांची भंबेरी उडाली. ही चारचाकी रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हा सर्व प्रकार थट्टामस्करीमुळे झाल्याचे त्या मुला-मुलीने सांगितले. या प्रकारामुळे पोलिसही हैराण झाले होते. मात्र, हा प्रकार गमतीतून झाल्याचे सांगत संबंधित मुलगी तरुणाने हात झटकले होते. यासारखे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत. पण त्या-त्या वेळी संबंधितांनी मुलांना समज दिली आहे. वेगात दुचाकी चालवणे, कट्ट्यावर मित्र-मैत्रिणींची टर्रर्र उडवताना भान ठेवणे, हटकणा-यांकडे दुर्लक्ष करणे यासारख्या गंभीर बाबी ही मुले सहजच घेतात. पण त्यांचे परिणाम हे गंभीर होतात.

इंटरनेट वापरावर नियंत्रण पाहिजे
टीव्ही,इंटरनेटच्या अतिरेकामुळे पालक आणि मुलांमध्ये संवाद होत नाही. अल्पवयीन मुलांना इंटरनेट वगैरेच्या सुविधा देताना पालकांनी समजूतदारपणा आणि सक्तीने वागले पाहिजे. चित्रपटातील प्रसंगाचे अनुकरण मुले सध्या करू लागली आहे. डॉ.अमोलमहाजन, मानसोपचारतज्ज्ञ

टवाळखोरांचे अड्डे
गणेशकॉलनी चौक, मू.जे.महाविद्यालय परिसर, रिंग रोड, खान्देश सेंट्रल परिसर, मेहरूण तलाव, मोहाडी रस्ता, नूतन मराठा महाविद्यालय परिसर.

घटनांमध्येवाढ :गुरुवारी टवाळखोरांनी रेल्वेमध्ये विद्यार्थिनींचे फोटो काढल्याचा केमिस्ट भवन येथे दोन अल्पवयीन मुलींची छेड काढली होती. या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे.

निर्भया पथकाकडून शहरात तपासणी
शुक्रवारीघडलेल्या प्रकारानंतर शनिवारी निर्भया पथकाने शहरातील महाविद्यालय परिसरांमध्ये कसून तपासणी करून टवाळखोरांना हटकण्यात आले. सायंकाळी वाजेच्या सुमारास खान्देश सेंट्रल परिसरात गस्त वाढवण्यात आली होती. असे पथकाच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक जीजा गुट्टा यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

तलावावर ‘शाळा’
मेहरूणतलाव मोहाडी परिसरात वर्दळ नसल्याचा फायदा घेऊन अल्पवयीन शाळकरी मुले दररोज एकत्र येतात. सिगारेटचे झुरके घेत त्यांच्या गप्पा रंगतात. प्रेमीयुगुलांचाही या भागात वावर असतो. अशात मुले नेमकी शाळेत जातात, की सहलीला येतात हेच कळत नाही. या भागात पोलिसांच्या गस्तही होतात पण काही उपयोग नाही.

आयएमआर महाविद्यालयाच्या परिसरात शनिवारी निर्भया पथकाने टवाळखोरांना हुसकावून लावले. तसेच घोळका करून बसलेल्या तरुणांना त्यांनी समज दिली.

‘त्या’ तरुणावर विनयभंगाचा गुन्हा
अपहरणनाट्यकरणारा विशाल भालेराव या तरुणाविरोधात मुलीच्या आईने विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. रामानंदनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच त्याला अटक केली होती. याप्रकरणी सहायक निरीक्षक सुजाता राजपूत पुढील तपास करीत आहेत.