आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगला उप्रकम: तहसीलमधून अवघ्या 10 मिनिटांत मिळू शकेल ऑनलाइन दाखला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगाव तहसील कार्यालयात तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल सही असलेले ऑनलाइन दाखले दिले जात आहेत. हा पायलेट प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता 1 ऑगस्टपासून जळगाव जिल्ह्यात 10 प्रकारचे दाखले ऑनलाइन दिले जाणार आहेत. या सुविधेमुळे केवळ 10 मिनिटांमध्ये दाखले मिळविणे शक्यअसल्यामुळे वेळेची बचत होणार आहे.
जळगाव तहसील कार्यालयात ‘महा ई-सेवा’ केंद्रामार्फत ऑनलाइन दाखले दिले जात आहेत. आतापर्यंत उत्पन्नाचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकाचा दाखला असे 10 हजार दाखले ऑनलाइन पद्धतीने दिली गेली आहेत. त्यात आता आणखी काही दाखल्यांची वाढ होणार असून एकूण 10 प्रकारचे दाखले ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहेत. ऑनलाईन पद्धतीमुळे वेळ, पैसा आणि कागदाची मोठी बचत होणार आहे. शिवाय एकाच दाखल्यासाठी विद्यार्थ्यंसोबत पालकांची शासकीय कार्यालयात होणारी फिरफिर थांबणार आहे.

अशी आहे प्रक्रिया
‘महा ई-सेवा’ केंद्रावर दाखल्यासाठी अर्ज आल्यावर केंद्रचालक कागदपत्रे स्कॅन करून तहसील कार्यालयात पाठवतात. तेथे कार्यालयीन सोपस्कार पूर्ण झाल्यावर तहसीलदारांकडे दाखला जातो. तहसीलदार हा दाखला मान्य करून त्यावर डिजिटल स्वाक्षरीची मोहोर उमटवतात. त्यानंतर ‘महा ई-सेवा’ केंद्रावरून त्याची पिंट्र काढून लाभार्थ्याला दाखला दिला जातो. ही प्रक्रिया केवळ 10 मिनिटांत होते.
घरूनही होणार काम
अधिकारी कार्यालयात नसल्यामुळे रखडणारे काम ऑनलाइन सिस्टिममुळे रखडणार नाही. अधिकारी बाहेरगावी, सुटीवर असतांना किंवा घरी असताना देखील ऑनलाइन दाखल्यावर स्वाक्षरी करू शकणार असल्याने दाखल्यांचे काम रखडणार नाही.
कामाच्या व्यापावर वेळ अवलंबून
तहसीलदारांकडे दररोज येणार्‍या ऑनलाइन दाखल्यांच्या संख्येवर दाखला किती वेळात मिळतो हे अवलंबून असेल. एकाच दिवशी जास्त दाखले आल्यास दाखल्याचे डाऊनलोडिंग, कागदपत्रे तपासणी यासाठी वेळ लागल्यास किंवा इंटरनेटचा वेग आणि तांत्रीक अडचणीमुळे दाखला मिळण्यास विलंब होऊ शकतो. या शक्यता गृहीत धरून दाखला मिळण्यास सुरुवातीला एक दिवसाचा विलंब होण्याची देखील शक्यता प्रशासनाने व्यकत केली आहे.