आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ शहराच्या कमाल तापमानात झाली वाढ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - गेल्या पंधरवड्यापासून थंडीची हुडहुडी कायम असली तरी मकरसंक्रमणानंतर कमाल तापमानात वाढ झाली आहे. मंगळवारी शहराचे कमाल तापमान 11. 5 तर किमान तापमान 31. 5 अंश नोंदविण्यात आले. कमाल आणि किमान तापमानात तब्बल 20 अशांची तफावत निर्माण झाली आहे. उत्तर भारतात होणा-या बर्फवृष्टीमुळे राज्यात थंडीची लाट पसरली. गेल्या पंधरवड्यापासून शहराचे तापमान 10 अंश होते.
तीन दिवसांपूर्वी शहराचे तापमान 9 अंशापर्यंत पोचले होते. मकरसंक्रांतीनंतर मात्र शहराच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. शहराचे मंगळवारचे तापमान 31. 5 अंशावर पोचले आहे. यामुळे दिवसा उन्हाचे चटके तर रात्री थंडीचा तडाखा शहरवासियांना सहन करावा लागत आहे. पहाटे शहराला धुक्याने वेढा दिला जात असून सकाळी दहापर्यंत परिसरात धुके कायम असते. आर्द्रतेतही तफावत निर्माण होत आहे. शहराची आजची आर्द्रता 78 टक्के नोंदविण्यात आली. वातावरणातील बदलाने रुग्णसंख्येतही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.