आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात अाठवडाभर जाणवणार 42 अंश तापमानाचा तडाखा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एप्रिल महिन्यातच ४० अंशांचा पारा पार करणाऱ्या तापमानात गेल्या अाठवड्यात दाेन ते तीन अंशांनी घसरण झाली हाेती; परंतु अाता हवेचा वेग वाढल्याने अार्द्रतेत घट झाली अाहे. तसेच कमी-अधिक दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे उष्णता वाढली अाहे. परिणामी, १० ते १७ एप्रिलपर्यंत पारा ४२ अंशांवरच कायम राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला अाहे. दरम्यान, सोमवारीही पारा ४२ अंशांवर स्थिरावल्याने दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट हाेता.
 
अावश्यक कामानिमित्त बाहेर पडताना नागरिक उन्हापासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययाेजना करीत आहे. नेहमी वाहनांच्या गर्दीमुळे गणेश काॅलनी ते चित्रा चाैकादरम्यानच्या रस्त्यावर दुभाजकाअभावी वाहतूक काेंडी हाेत असते. मात्र, साेमवारी दुपारी १२ वाजेपासून ते वाजेपर्यंत अत्यंत शुकशुकाट हाेता. हिच स्थिती फुले मार्केटमध्ये हाेती. दिवसभर गजबजलेले असणाऱ्या फुले मार्केटमधील हाॅकर्स ग्राहक नसल्याने बसलेले हाेते. विश्रांतीनंतर तापमानाने प्रथमच चाळिशी पार केली आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या अंगाची लाही-लाही झाली. मुलांच्या परीक्षांचा कालावधी असल्याने नाइलाजाने नागरिकांना घराबाहेर पडावे लागले.

उन्हापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी रुमाल, स्कार्फ, मास्क, टाेप्या, गाॅगल्स यांचा तसेच टरबूज, डांगर, अननस, उसाचा रस, ताक, मठ्ठा, काेल्ड्रिंक्स यांच्या सेवनातही वाढ झाली अाहे.

उन्हाची तीव्रतावाढल्याने उलटी, ताप, जुलाबाचा त्रास नागरिकांना जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हात जाताना काळजी घ्यावी.
- डॉ.गिरीश सहस्त्रबुद्धे
 
का वाढले तापमान?
सध्याहवेचा वेग माेठ्या प्रमाणात वाढला अाहे. त्यामुळे अार्द्रतेत घट हाेऊन तापमानामध्ये माेठी वाढ झाली अाहे. हवेच्या कमी -अधिक दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने उन्हाच्या तीव्र झळा अाठवडाभर जाणवणार अाहे. हिमालय पर्वत पर्वत रांगा वगळता देशभरात ही स्थिती राहणार अाहे. वेळप्रसंगी वारा वावटळ उठण्याची शक्यता वेधशाळेकडून वर्तविण्यात अाली अाहे.
 
उष्माघाताबाबत उपाययोजना करा
जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेस उन्हात फिरणेही अवघड झाले आहे. मनुष्यासह प्राण्यांवरही त्याचा परिणाम झालेला आहे. चोपडा शहरातील मुलाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. याविषयी आरोग्य यंत्रणेने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला नाही. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच उष्माघाताबाबत उपाययोजना करून त्या मुलाच्या मृत्यूबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
बातम्या आणखी आहेत...