आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमाल तापमानही घसरले; दिवसा २५.७ अंशापर्यंत तर रात्रीचे तापमान ७.४ अंशांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तरेतील बर्फवृष्टीमुळे रात्री ७.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरलेल्या तापमानाने थंडीचा कडाका वाढला अाहे. थंडीच्या लाटेमुळे दिवसाचे कमाल तापमानही २५.७ अंशांपर्यंत खाली उतरल्याने शुक्रवारी दिवसभर गारठा जाणवत हाेता. थंड वारा, झाेंबणाऱ्या थंडीने जळगावकरांनी दिवसभर गरम कपड्यांचा सहारा घेतला. सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान पुन्हा खाली उतरल्याने गारठ्याची तीव्रता अधिक वाढली अाहे. 

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी हाेत अाहे. हिमाचल प्रदेश, सिमला येथे बर्फवृष्टीने उच्चांक गाठला अाहे. डिसेंबरपासून उत्तरेतूकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या ध्रुवीय वाऱ्यांमुळे उत्तरेतील थंडीची लाट महाराष्ट्रापर्यंत पाेहोचली अाहे. बर्फवृष्टीमुळे ध्रृवीय वाऱ्यांची तीव्रता उणे ४० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत पाेहोचली अाहे. या वाऱ्याच्या तीव्रतेमुळे उत्तर महाराष्ट्रातील तापमान अंशांच्या खाली अाले अाहे.अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, या विभागात थंडीची तीव्रता अधिक अाहे. त्या पाठाेपाठ विदर्भ मराठवाड्यात गारठा अाहे. जळगाव जिल्ह्यात पारा ७.४ अंशांपर्यंत खाली अाला अाहे. किमान दाेन दिवस हा गारठा कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला अाहे. 

विद्यार्थ्यांचे वेळापत्रक प्रभावित 
सकाळीवाजता शाळेसाठी बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक थंडीच्या लाटेमुळे प्रभावित झाले अाहे. सकाळी ५.३० ते वाजेपर्यंत बाहेर फिरायला जाणाऱ्या जळगावकरांची पहाटही काहिशी उशिरा हाेत असल्याचे चित्र अाहे. पहाटेची शाळा असणारे विद्यार्थी थंडीमध्ये कुडकुडत शाळेत जात अाहेत, तर रस्त्यावर चहाच्या दुकानावर गर्दी वाढली अाहे.