आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकर्षक दिसण्यासाठी मोबाइल पाऊचची तरुणींना भुरळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मोबाइल ही आपल्या जीवनशैलीतील महत्त्वाची बाब बनली आहे. आजकाल महागडे मोबाइल घेण्यावर प्रत्येकाचाच भर असतो. फक्त तरुणच नाही तर तरुणींमध्येसुद्धा मोबाइलचे वेड लागले आहे. महागडा असो वा कमी किमतीचा तो आकर्षक कसा दिसेल यासाठी तरुणींची धडपड असते. माझा मोबाइल हा सर्वांपेक्षा वेगळा दिसायला हवा यासाठी त्यांचे प्रयत्‍न असतात. ज्वेलरी, कपडे या प्रमाणेच मोबाइलच्या असेसरीजवर भर दिला जातो. मोबाइलची सौंदर्यता वाढविण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग तरुणींतर्फे केले जातात. मोबाइलला आकर्षक रंगीबेरंगी स्टिकर्सने सजविले जाते. त्याचप्रमाणे मोबाइलची सुरक्षित राहावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोबाइल पाऊच बाजारात मिळतात. याचा ट्रेंड सध्या बदलला आहे. यात मुलींच्या आवडीनुसार हे पाऊच बाजारात उपलब्ध असून अनेक व्हरायटी यात पाहायला मिळतात. टू इन वन उपयोग असलेले हे पाऊच सध्या अनेक ठिकाणी विक्रीस यायला लागले आहेत. साधारण 20 ते 350 रुपयापर्यंतचे मोबाइल पाऊच बाजारात उपलब्ध आहेत.