आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात दहाचे नाणे चलनात कायम; बँकांनी दिले स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - हजार,पाचशेरुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर सरकारने महानगरांमध्ये १०, २० आणि ५० रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात आणल्या. त्यामुळे दहाची नाणी चलनातून बंद झाल्याची अफवा पसरलेली आहे. मात्र, ही नाणी चलनातून बाद करण्याबाबत रिझर्व्ह बँकेचे कोणत्याही प्रकारचे निर्देश नाहीत, असा खुलासा बँकांनी केला आहे. तर यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने ही वृत्त प्रसिद्ध करून प्रकाश टाकला होता. 
 
नोटबंदीनंतर बँकांसह बाजारपेठेत नोटा नाण्यांची टंचाई निर्माण झाली होती. रिझर्व्ह बँकेने नवीन नोटा नाणी चलनात आणली. याचदरम्यान महानगरांमध्ये रिझर्व्ह बँकेने १०, २० आणि ५० रुपयांच्या प्लास्टिक नोटा चलनात आणल्या. दहाची नवीन नोटही चलनात आणण्याचा रिझर्व्ह बँकेने निर्णय घेतला. त्यामुळे आता १० रुपयांची नाणी चलनातून रद्द होतील, अशी भीती नागरिकांना वाटली. या भीतीपोटी १०ची नाणी चलनातून रद्द झाल्याची सर्वत्र अफवा पसरली जात आहे. त्यामुळे दहाची नाणे स्वीकारण्यावरुन वादही उद्भवले होते. 
 
अफवांवर विश्वास ठेवू नये; दहाची नाणी स्वीकारण्यास बँका बांधील 
व्यापाऱ्यांनी दहाची नाणी खात्यात जमा करायला हवीत. दहाची नाणी स्वीकारण्यास बँका बांधील आहेत. खाते नसलेल्यांना बँका नाणी बदलून देऊ शकत नाहीत. ही नाणी चलनातून रद्द झाल्याबाबत रिझर्व्ह बँकेचे कोणत्याही प्रकारचे आदेश नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. बी.एस.मराठे,उपव्यवस्थापक अग्रणी बँक 
 
शाखांमध्ये नाणी स्वीकारतात 
दहाची नाणी चलनातून रद्द झालेली नाहीत. सर्व अफवा आहेत. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सर्व शाखांमध्ये दहाची नाणी स्वीकारल्या जात आहेत. कुणाचीही नाणी स्वीकारण्यास नकार देण्यात येत नाही. नागरिकांना दहाची नाणी त्यांच्या खात्यात जमा करता येतात. सुनीलसराफ, जिल्हा समन्वयक, एसबीआय 
 
नागरिकांनी काढली नाणी बाहेर 
नागरिकांनी संचय केलेली दहाची नाणी मोठ्या प्रमाणात बाजारात आणली. कोठेही व्यवहारासाठी दहाच्या नाण्यांचा वापर सुरू झाला. त्यातच चलन व्यवहारात येण्यासाठी रिझर्व्ह बंॅकेनेही दहाची नाणी चलनात आणली. बाजारात सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणावर दहाची नाणी आली आहेत. अफवांमुळे ही नाणी स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...