आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष: तंबाखू विक्रीच्या महसुलापेक्षा उपचारावर दहापट खर्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- तंबाखू, गुटखा विक्रीतून शासनाला माेठ्या प्रमाणात महसूल मिळताे. परंतु तंबाखू गुटख्यामुळे हाेणाऱ्या अाजारामुळे वैद्यकीय उपचारावर त्या महसूलापेक्षा १० पट अधिक खर्च हाेत अाहे. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांवर कायमस्वरूपी बंदी अाणणे हा एकमेव पर्याय अाहे, असे मत टाटा मेमाेरिअल सेंटरचे हेड, नेक सर्जरी युनिटचे प्रमुख डाॅ. प्रथमेश पै यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले. टाटा हाॅस्पिटलचे चंदिगड, वाराणसी, विशाखापट्टणम, गुवाहाटी येथे लवकरच केंद्र सुरु हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


जळगावात एका कार्यक्रमानिमित्त अालेल्या डाॅ. पै यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मान चेहऱ्याशी निगडित कॅन्सरचे प्रमाण एकूण कॅन्सर रुग्णांच्या तुलनेत ३० टक्के अाहे. त्यातही अाणखी ३० टक्के रुग्ण हे केवळ चेहऱ्याच्या कॅन्सरचे अाहे. ताेंडाशी निगडित रुग्णांमध्ये महिलांचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून हे चिंताजनक अाहे. 


जबडा उघडता उपचार

गेल्या दीड ते दाेन वर्षांपासून कॅन्सरचे पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास वेदनारहित उपचार केले जातात. प्लास्टिक सर्जरीप्रमाणेच पायातील हाड रक्तवाहिन्या घेऊन जबड्याची पुनर्बांधणी करता येत अाहे. त्यामुळे चेहरा खराब हाेता शस्त्रक्रिया करणे शक्य झाले अाहे. त्याचप्रमाणे जबडा उघडताही अाता राेबाेटिक सर्जरी केली जात अाहे. 


कॅन्सरचे डाॅक्टर कमी 
ताेंडाच्याकॅन्सरवर हाेणारी शस्त्रक्रिया अवघड असल्याने दिवसाला एकच हाेते. त्यातही डाॅक्टरांचे प्रमाण अत्यंत कमी अाहे. त्यामुळे टाटा मेमाेरिअलमध्ये ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात अाले अाहे. तीन वर्षांच्या ट्रेनिंगनंतर वर्षाकाठी १० डाॅक्टर तयार हाेत अाहे. टाटा मेमाेरिअलमध्ये दरवर्षी नव्याने हजार रुग्णांची नाेंद हाेते. 


तरुणांचे प्रमाण वाढले 
अनेकदा कॅन्सरची सुरुवात झालेले रुग्ण तिसऱ्या चाैथ्या टप्प्यात उपचारासाठी येत असतात. त्यांच्यावर उपचार केल्यानंतरही केवळ ४० टक्के रुग्णच बरे हाेत असतात. तर पहिल्या टप्प्यात येणारे ८० टक्के रुग्ण बरे हाेतात. गेल्या काही वर्षांत ३० ते ४० वयाेगटातील तरुण रुग्णांचे प्रमाण वाढत चालले अाहे

बातम्या आणखी आहेत...