आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ वाद झाल्याने ट्रकच्या काचा फोडल्या, पोलिसांनी तत्काळ निवळला तणाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात ट्रकचालक पादचारी यांच्या झालेल्या किरकोळ वादातून ट्रकच्या काचा फोडल्याची घटना सोमवारी सायंकाळी वाजात घडली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. 
 
महामार्गावरून शेख अब्दुल हकीम शेख रहिम (वय २९, रा.आझादनगर) हे ट्रकचालक जात होते. याच वेळी पादचारी अकबर त्याच्या सोबतच्या दोन जणांना त्यांनी रस्त्यातून बाजुला सरकण्यास सांगितले. याचा राग आल्यामुळे अकबरसह तिघांनी ट्रकचालक अब्दुल यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या ट्रकच्या काचा फोडल्या. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी अब्दुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...