आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्जमाफीच्या कामाचा तणाव; पाचाेरा सहायक निबंधकाला हृदयविकाराचा झटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पाचोरा येथील सहायक निबंधक पोपट श्यामराव पाटोळे (वय ५४) यांना बुधवारी कार्यालयातच हृदयविकाराचा झटका अाला. कर्जमाफीच्या वाढत्या कामामुळे हृदयविकाराचा झटका अाल्याचा अाराेप कर्मचारी संघटनेने केला अाहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल केले अाहे.

 

पाटोळे हे पाचोरा येथे सहाय्यक निबंधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे भडगाव तालुका निबंधक कार्यालयाचा अतिरिक्त पदभार आहे. शेतकरी कर्जमाफीमुळे कामाच्या निर्माण झालेल्या तणावामुळे जून महिन्यापासून सहकार विभागाचे अधिकारी, कर्मचारी तणावात वावरत आहेत. शासनाने कर्जमाफीबाबत अनेक परिपत्रके काढली. सुटीच्या दिवशी कार्यालये सुरू ठेवण्याचे शासनाने आदेश दिले. रविवारसह दुसरा चौथ्या शनिवारीही कर्मचारी काम करीत आहेत. कार्यालयात येण्याची वेळ ठरलेली आहे. जाण्याची वेळ निश्चित नाही. बारा ते चौदा तास काम करावे लागत आहे. कर्जमाफीसाठी अनेक प्रकारची माहिती शासनाकडून माहिती मागविली जात आहे. ती माहिती सोसायट्यांकडून घ्यावी लागते. सोसायटींच्या सचिवांचे पगार झालेले नाहीत.

 

ते माहिती देण्यास तयार नाहीत. त्यातच शासनाकडून माहिती देण्याबाबत दबाव टाकण्यात येत आहे. या परिस्थितीतीमुळे निर्माण झालेल्या कामाच्या तणावामुळेच पाटोळे यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याचा आरोप सहकार खाते कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब महाले, बापू साळवे यांच्यासह पदाधिका ऱ्यांनी केला आहे. दरम्यान जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी रूग्णालयात जाऊन पाटोळे यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. यावेळी सहायक निबंधक अशोक बागल, रवींद्र भोसले, दिलीप दोरकर, दिपक पाटील आदी उपस्थित होते.

 

सुटीच्या दिवशीही काम
कर्जमाफीचीघोषणा झाल्यापासून सहकार निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर अतिरक्त कामाचा ताण वाढला आहे. तसेच तालुकास्तरावर सहायक निबंधकांना माहिती मिळवताना नाकीनऊ येत आहे. सुटीच्या दिवशीही काम करावे लागत आहे. यामुळे मानसिक ताण वाढल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...