आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tension On Congress Supporters Face For Election

प्रचाराच्या मशाली पेटल्या पण चेहऱ्यावर तणाव कायम!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लोकसभा निवडणुकीत पानिपत झालेल्या काँग्रेसचा स्थानिक पातळीवर फारसा प्रभाव नाही. प्रमुख विरोधक जोमात असताना आघाडीचा निर्णय न झाल्याने राष्ट्रवादीदेखील अपक्ष उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून जिल्हा काँग्रेसने शनिवारी प्रचाराची मशाल पेटवण्याची औपचारिकता पूर्ण करणारे पदाधिकारी चेहऱ्यावरील तणाव मात्र लपवू शकले नाहीत.
स्थानिक पातळीवर काँग्रेसपुढे वेगळीच आव्हाने
अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या अपेक्षा उंचावल्या असल्या तरी स्थानिक पातळीवर मात्र काँग्रेस पुढील आव्हाने वेगळीच आहेत. संघटनात्मक पातळीवर पक्षाला उभारी देणाऱ्यांपेक्षा ओरबाडणारेच अधिक भेटल्याने महापालिकेच्या निवडणुकीतदेखील काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. विधानसभेच्या निमित्ताने जिल्ह्यात किमान पक्ष संघटन व्हावे, अशी माफक अपेक्षा ठेवत पक्षाने संघटनेत काही बदलदेखील केले आहेत. मात्र, काँग्रेस संपवण्याची शपथ घेतलेल्या विरोधकांची मोट भक्कम असल्याने या वेळी कसा निभाव लागणार? या चिंतेने पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर तणाव वाढल्याचे चित्र शनिवारी काँग्रेस भवनात आयोजित बैठकीत जाणवले.

देशभरात मोदी लाटेमुळे काँग्रेसची वाताहत झाली. राज्यात तर सुपडे साफ झाल्याची स्थिती ओढवली. पक्षाचे प्रमुख दिग्गज पराभूत झाल्याने त्याचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीतदेखील जाणवेल, अशी धास्ती काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील घेतली आहे. अनेक वाहिन्या, एजन्सीज, संस्था, माध्यमे यांनी केलेल्या सर्वेक्षणात राज्यात परिवर्तन होईल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यात मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडूनदेखील धोका होण्याची शक्यता वाढली आहे. अशा स्थितीत पक्षाचे जळगाव जिल्ह्यात अस्तित्व टिकवण्याचे आव्हान स्थानिक पदाधिकाऱ्यांपुढे असल्याने दबाव वाढला आहे.

सक्षम उमेदवारांचा शोध
रावेर आणि जामनेरमध्ये उमेदवार जवळपास निश्चित असला तरी जळगाव शहरात अामदार सुरेश जैन यांच्याविरोधात सक्षम उमेदवार कोण द्यावा, यावर निर्णय झालेला नाही. इच्छुकांची संख्या मोठी असली तरी निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा शोध कायम आहे. तर दुसरीकडे उमेदवारांची भाऊगर्दी असलेला आणि सध्या राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार म्हणून निवडून आलेल्या अमळनेरचा देखील उमेदवार ठरलेला नाही. आघाडी झाल्यास ती जागा तडजोडीत सोडल्यास काँग्रेसला केवळ तीनच जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेदेखील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये िचंतेचे वातावरण आहे.