आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tenth Reexamination Result Will Be Declare Before 21th August

दहावी पुनर्परीक्षेचा निकाल २१पूर्वी, प्रमुख महाविद्यालयांत अकरावी साठी शिल्लक नाहीत जागा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - फेब्रुवारी-मार्च२०१५ मध्ये नापास झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा २१ जुलैपासून सुरू झाली आहे. या परीक्षेचा निकाल २१ ऑगस्टपूर्वी जाहीर केला जाणार असल्याचे शासनातर्फे कळवण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील एकही प्रमुख महाविद्यालयात अकरावीसाठी जागा शिल्लक नसल्याची स्थिती अाहे.

नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शासनाने तत्काळ पुनर्परीक्षा घेतली. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. या पुनर्परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता चालू वर्षीच अकरावीला प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी शासनाने वेगळे नियोजन केले नाही. जिल्ह्यात नापास झालेले हजार ५० विद्यार्थी या परीक्षेला सामोरे गेले आहेत. त्यातील निम्मे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर जवळपास हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न उभा राहणार आहे. त्यातच शहरात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तूर्त तरी काही पर्याय दिसून येत नाही. मात्र, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून या विद्यार्थ्यांना प्रवेशित करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.