आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानळदा येथील तणाव निवळला; पण लग्नासाठी नवरदेव तास ताटकळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तालुक्यातील कानळदा येथे मंगळवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी हाेर्डिंगला दगड मारून फाडले. हा प्रकार बुधवारी सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात अाल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला. संतप्त ग्रामस्थांनी रस्ता अडवून गावात येणाऱ्या एसटीवर दगडफेक करत काचा फाेडल्या. याप्रकरणी तालुका पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात अाला असून दाेन संशयितांना ताब्यात घेण्यात अाले अाहे. दरम्यान, सकाळी ११ वाजेपर्यंत गावातील तणाव निवळला मात्र यामुळे एका नवरदेवाला ताटकळत बसावे लागले.
 
दुपारी १२ वाजता गावातील एका तरुणाचा विवाह सोहळा होता. सकाळी ११ वाजेच्या सुमारास तो मारुती मंदिराच्या पाराजवळ येऊन उभा राहिला मात्र लग्नाचा मुहूर्त दोन तास पुढे ढकलावा लागला. दुपारी वाजेच्या सुमारास त्याचे लग्न लागले.
 
कानळदा येथील जळगाव तालुका कापूस उत्पादक सेवा सहकारी संस्थेच्या इमारतीवर मंगळवारी रात्री १०.३० वाजता काही तरुणांनी जयंती उत्सवाचे हाेर्डिंग लावले हाेते. रात्री १२ वाजेपर्यंत तरुण त्याच ठिकाणी बसलेले हाेते. बुधवारी सकाळी ८.३० वाजता हाेर्डिंगला काेणीतरी दगड मारून फाडल्याचे लक्षात अाले. ही बातमी गावात पसरल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळाजवळ गर्दी केली. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर सकाळी ८.३० ते ९.३० वाजेपर्यंत ठिय्या अांदाेलन केले.
 
त्यानंतर रस्त्यावर बैलगाडे अाडवे लावून रस्ता अाडवला. तसेच काही वेळानंतर अालेल्या एसटीवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या. घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर १० वाजता तालुका पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक सागर शिंपी पथकासह गावात पाेहाेचले. संतप्त ग्रामस्थांनी घडलेला प्रकार त्यांना सांगितला. तसेच हाेर्डिंग फाडणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. शिंपी यांनी रस्त्यावरील बैलगाडे बाजूला करून रस्ता माेकळा करण्यास सांगितले. दरम्यान, मंगळवारी रात्री गावात एका लग्नाची बीद हाेती. या ठिकाणी रात्री वाजेपर्यंत नाचगाणे सुरू हाेते. ते बंद झाल्यानंतर हा प्रकार घडला असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला अाहे.
 
शांतता समितीच्या बैठकीत ग्रामस्थांचा संताप: उपविभागीयपाेलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी सकाळी १०.३० वाजता घटनास्थळाची पाहाणी केली. तसेच ग्रामपंचायत कार्यालयात शांतता समितीची बैठक घेतली. या वेळी नांद्रा येथील जयराम पांडुरंग साेनवणे यांनी वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांना माहिती देऊनही ते लवकर पाेहाेचले नाहीत. तसेच पाेलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनाही माहिती दिल्यानंतर दाेन तासांनी ते गावात अाल्याचा अाराेप केला. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर काहींनी बुधवारचा अाठवडे बाजार बंद ठेवण्याची मागणी केली. मात्र, सांगळे यांनी ही बाब मान्य केली नाही.

उलट ग्रामस्थांनीच अाठवडे बाजाराला संरक्षण दिले पाहिजे. सांगून संतप्त ग्रामस्थांची समजूत काढली. तसेच मुकुंद सपकाळे यांनीही संतप्त ग्रामस्थांना शांत केले. या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी १३ अाणि १४ एप्रिल राेजी गावात दारूबंदीची मागणी केली. त्यावर सपकाळे यांनी सांगितले की, जाे व्यक्ती मिरवणुकीत दारू पिऊन धिंगाणा घालेल, त्याला पाेलिसांच्या ताब्यात द्यावे. तसेच या घटनेविषयी साेशल मीडियावर पाेस्ट टाकू नये, असे सांगळे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन ग्रामस्थांना शांततेचे अावाहन केले . तसेच जिल्ह्यातील सर्व पाेलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सर्तकता बाळगण्याचे अादेश दिले
 
दाेन संशयित पोलिसांच्या ताब्यात
हाेर्डिंग फाडल्याप्रकरणी तालुका पाेलिसांनी बुधवारी सकाळी ९.३० वाजता मयूर साेपान सपकाळे मयूर बापू सपकाळे यांना ताब्यात घेतले, तर तिसरा संशयित फरार असून त्यालाही लवकर अटक करणार असल्याचे सांगळे यांनी सांगितले. याप्रकरणी सिद्धार्थ दगडू साेनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तसेच विना परवानगी हाेर्डिंग लावल्याचा गुन्हा दाखल करण्याचे अादेश देखील पाेलिस अधीक्षकांनी दिले.
 
गावातील तणावाचा फटका बसला नवरदेवाला
कानळदा येथील मनाेज धनराज सपकाळे याचे बुधवारी लग्न हाेते. मात्र, हाेर्डिंग फाडल्यामुळे गावात सकाळपासूनच तणाव हाेता. मनाेज सकाळी ११ वाजता गावातील मारुतीच्या पारावर येऊन उभा हाेता. गावात घडलेल्या घटनेमुळे तगडा पाेलिस बंदाेबस्त लावलेला हाेता. त्यामुळे मनाेजला १२ वाजेपर्यंत पारावर ताटकळत उभे राहावे लागले. त्यानंतर वरात अाली. लग्नाचा मुहूर्त दुपारी १२ वाजेचा हाेता. मात्र, तणावामुळे लग्न दुपारी वाजेच्या सुमारास लागले.
 
बातम्या आणखी आहेत...