आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात घुसून डोक्यात गोळी घातली; आंबेडकरनगरात हल्ला, जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आंबेडकरनगरात गुरुवारी रात्री ९.३० वाजता रिव्हाॅल्व्हर आणि धारदार शस्रांनी एका मजूर कुटुंबीयांवर भयंकर हल्ला केला. सहा जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला. एकाने रिव्हाॅल्व्हरने प्राैढाच्या डोक्यात गोळी झाडली तर दुसऱ्यावर धारदार शस्राने हल्ला केला.
सुमारे १५ ते २० मिनिटांच्या या हल्ल्यातून घरातील महिला आणि मुले बालंबाल बचावली. गोळीबाराचा आवाज होताच घरातील महिलांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड सुरू करताच हल्लेखोर पळून गेले. कौटुंबिक वाद आणि पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात जखमी झालेले दोघे मामा-भाचे असून हल्लेखोराने झाडलेली गोळी मामाच्या डोक्यात घुसून गालात अडकली होती. शेजारच्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. हल्ल्याच्या ठिकाणचे चित्र भयंकर होते. १० बाय १० च्या खोलीतील बेडजवळ रक्त सांडलेले दिसत होते. हल्लेखोर पळून गेल्यानंतर नागरिकांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. घटनेनंतर आंबेडकरनगरात सन्नाटा पसरला होता.
डोक्यात घुसली गोळी
^तायडेयांच्या डोक्याच्या मागच्या बाजूने गोळी आत घुसून गालामध्ये अडकली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर सोनवणे यांच्या छातीवर हातावर शस्त्राने वार केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉ.सतीशअहिरे, आपत्कालीन वैद्यकिय अधिकारी
^पूर्ववैमनस्यातूनहा हल्ला करण्यात आला आहे. मी जळगावला आल्यापासून दोन वेळेस त्यांचा वाद झालेला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेण्यात आले आहे. मोक्षदापाटील, अपर पोलिस अधीक्षक
या हल्ल्यात चंद्रमणी तायडे यांच्या डोक्यास गोळी लागली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर त्यांचे भाचे गोविंदा पंंडित सोनवणे यांची प्रकृती स्थिर आहे.
आंबेडकरनगरात गुरुवारी रात्री वाजता गोविंदा सोनवणे यांच्या घरासमोरील दहा बाय दहाच्या खोलीमध्ये सोनवणे यांच्यासह चंद्रमणी तायडे, दीपक पोपट पवार, राहुल कांतीलाल सोनवणे टीव्ही बघत होते. सोनवणे यांचा नातू विवेक योगेश पगारे झोपलेला होता. चंद्रमणी खुर्चीवर तर गाेविंदा सोनवणे कॉटवर बसलेले होते. रात्री ९.३० वाजता सतीश मिलिंद गायकवाड, सचिन दशरथ सैंदाणे, शाेभा सतीश गायकवाड, पदमाबाई मिलिंद गायकवाड प्रकाश मिलिंद गायकवाड लक्ष्मी सचिन सैंदाणे हे गाेविंदा साेनवणे यांच्या घरात घुसले. या वेळी सतीशची पत्नी शाेभा हिने गाेविंदा चंद्रमणी यांच्यावर गाेळ्या झाडण्यास सांगितले. त्यानंतर सतीश याने गाेविंद साेनवणे यांच्या छातीत हातावर गाेळी झाडली. तर सैंदाणे याने चंद्रमणी तायडे यांच्या डाेक्यात गाेळी घातली. ही गाेळी तायडे यांच्या डोक्यात मागच्या बाजूने आत घुसली. त्यामुळे चंद्रमणी रक्ताच्या थारोळ्यात पडले.
या हल्ल्यात चिमुकल्या विवेकसह इतर दोघे बालंबाल बचावले. हल्ल्यामुळे संपूर्ण घरात अंगणात रक्त सांडले होते. तर गोळीबाराच्या आवाजाने शेजारील महिला प्रचंड घाबरल्या हाेत्या. त्या जीवाच्या आकांताने अारडाअाेरड करू लागल्या. तर काहीजण पळत सुटले. सोनवणे यांच्या पत्नी वंदना यांनी दरवाजा लावून घेतला.
घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर आंबेडकरनगरातील नागरिक सोनवणे यांच्या घराकडे धावत गेले. ताेपर्यंत हल्लेखोर पसार झाले हाेते. नागरिकांनी याबाबत लागलीच शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी गाेविंद साेनवणे (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पाेलिस ठाण्यात सतीश मिलिंद गायकवाड, सचिन दशरथ सैंदाणे, शोभा सतीश गायकवाड, लक्ष्मी सचिन सैंदाणे, प्रकाश मिलिंद गायकवाड, पद्माबाई मिलिंद गायकवाड (सर्व रा. आंबेडकरनगर) यांच्या विरुद्ध भादंवि कलम ३०७, ४५२, १४३, १४७, १४८, १४९, आर्मअॅक्ट ३/२५ तसेच मुंबई पोलिस कायद्याचे कलमान्वये गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला.
रिक्षातून सिव्हिलमध्ये आणले
बेशुद्ध अवस्थेत असलेले चंद्रमणी तायडे गोविंदा सोनवणे यांना आंबेडकरनगरातील नागरिकांनी रिक्षात बसवले.त्यांना सिव्हिलमध्ये घेऊन येत असताना रथचौकात शनिपेठ पोलिसांचे वाहन भेटले. पोलिस निरीक्षक आत्माराम प्रधान कर्मचारी त्यांच्यासोबत दाेघांना घेऊन सिव्हिलमध्ये आले. याठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी दाेघांची तपासणी केली. या वेळी सिव्हिलमध्ये आंबेडकरनगरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली हाेती. तर जखमी असलेल्या दोघांचेही नातेवाईक प्रचंड आक्रोश करीत होते.
रुग्णालयात घरासमाेर बंदाेबस्त
घटनेनंतर आंबेडकर नगरातील सोनवणे यांच्या घरासमोर आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. अपर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन जखमी सोनवणे यांची विचारपूस केली. तसेच पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्याबाबत सूचना केल्या.
जखमीला घेण्यास नकार
गंभीर जखमी असलेल्या चंद्रमणी यांना दाेन खासगी रुग्णालयात नेण्यात अाले. परंतु त्यांनी व्हेंटीलेटर नसल्याचे कारण सांगून जखमींना दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले अाहे. रात्री दीड वाजेच्या सुमारास डॉ. सचिन इंगळे यांच्यासह तीन डॉक्टरांनी जखमी चंद्रमणी यांची तपासणी केली. शस्त्रक्रिया करून डोक्यातील गोळी काढण्याचा निर्णय घेतला होता.
तीन वेळेस झाले वाद
गोविंदासोनवणे सतीश गायकवाड या दोन्ही गटांमध्ये या पूर्वी तीन वेळा हाणामाऱ्या आणि किरकोळ वादही झाले आहेत. माजी नगरसेवक शालिक सोनवणे यांचे निधन झाल्यानंतर आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदावरूनही दोघांमध्ये वाद झाला होता. त्याचप्रमाणे २४ जून रोजी चंद्रमणी तायडे यांचा मुलगा शुभम (वय १६) याचा घरात शॉक लागून मृत्यू झाला होता. त्या वेळेसही सतीश गायकवाड इतरांनी त्याला मारहाण केली शॉक देऊन मारल्याचा आरोप चंद्रमणी सोनवणे यांनी केला होता. यावरूनही वाद झाला होता. चित्रा चौकात तीन महिन्यांपूर्वी गोविंदा सोनवणे यांनी सतीश गायकवाड याच्यावर तलवार हल्ला केला होता. याप्रकरणी सोनवणे यांना अटक झाली होती. दोन्ही गटांमध्ये या घटनेसह चार वेळेस हाणामाऱ्या झाल्या. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी झालेला हल्ला हा भीषण होता.
रक्ताच्या थारोळ्यासह काचांचा खच
हल्ल्यानंतर सोनवणे यांच्या घरात मोठ्याप्रमाणात रक्त सांडले होते. भिंतीवरील घड्याळ खाली पडले होते. घरात सर्वत्र काच पडलेले होते. बाटल्या, काचेचे ग्लास फुटल्याने काचांचा खच पडला हाेता. तर घराशेजारील महिलांनी हल्लेखोर चार व्यक्ती असल्याचे सांगितले.
एक्स-रेमध्ये गोळी
चंद्रमणीतायडे यांच्या डोक्याचा रात्री १० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात एक्स-रे काढण्यात आला. त्यामध्ये त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूने गोळी घुसून गालामध्ये अडकल्याचे स्पष्ट दिसत अाहे.
पती-पत्नी ताब्यात
घटनेनंतर रात्री ११ वाजता शनिपेठ पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी सतीश गायकवाड त्याची पत्नी शोभा गायकवाड यांना ताब्यात घेतले, असे अपर पाेलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...