आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐन उत्सवाच्या काळात पायाभूत चाचणी परीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रगतशैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी येत्या १४ ते ३० सप्टेंबर दरम्यान पायाभूत चाचण्यांचे आयोजन करण्याचे आदेश बालभारती शिक्षण आयुक्त कार्यालयाने गुरुवारी दिले. दिलेल्या मुदतीत परीक्षेचे आयोजन करण्याची मुभा शाळांना दिली आहे. शिक्षण आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी हे आदेश काढले.

शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात परीक्षा होणार होत्या. याविषयीचे आदेशही शिक्षण विभागाने काढले होते. मात्र, या परीक्षा पुढे ढकलत राहिल्या. आता सप्टेंबरचा मुहूर्त लाभला अाहे. परीक्षेच्या काळात गणेशोत्सवासह विविध सण येत आहेत. त्यामुळे परीक्षा कशा घ्याव्यात, असा प्रश्न शिक्षकांपुढे उभा राहिला आहे.

अशीअसेल परीक्षा : मुलांचीगणिताची समज, कौशल्ये, विचारक्षमता तपासण्यासाठी काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील. मुलांना कदाचित या प्रकारच्या प्रश्नांचे अनुभव या आधी मिळाले नसतील. त्यामुळे त्या प्रकारच्या प्रश्नांचा चाचणीपूर्वी सराव करून घ्यावा. म्हणजे मुलांना त्या गोष्टी चाचणीत करता येतील. या चाचण्या गोपनीय ठेवण्यात येणार आहे. संख्यांची समज तपासताना संख्येचे वाचन, लेखन तपासून ती संख्या नेमके किती? तसेच त्या संख्या शतक, दशक, एकक, अशी प्रतीके वापरून दाखविता आली पाहिजे. उदा. काड्यांचे गठ्ठे, सुटे मणी, माळा, १० च्या एकेकच्या नोटा आदींचा समावेश असेल.

अशी प्रात्यक्षिके होणार
ऐकलेली संख्या प्रतीके वापरून दाखवणे. अंकातील संंख्या वाचून प्रतीके देणे, प्रतीके पाहून संख्यांची नावे सांगणे.
कोन मापकाच्या साह्याने कोन मोजणे, दिलेल्या मापात कोन काढणे.
{कंपासच्या साह्याने वर्तुळ काढण्यासह विविध प्रात्यक्षिकांद्वारे परीक्षा घेतली जाणार आहे.