आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथ जगणं शिकवतात : महानोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-नोकरीसाठी केले जाणारे शिक्षण आणि त्यानिमित्त होणारे वाचन आवश्यक असले तर त्याशिवाय होणारे वाचन, ग्रंथाचे अध्ययन हे जगण्याची दिशा ठरविण्यासाठी उपयोगी ठरतात. जगायचे कशासाठी हा प्रश्न ज्याला पडतो त्याला ग्रंथामधूनच उत्तर मिळू शकते. ग्रंथ जगण्याचे शिक्षण देणारे मोठे माध्यम असल्याचे मत पद्मर्शी कवी ना. धों. महानोर यांनी व्यक्त केले.
राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे लेवा बोर्डिंग हॉलमध्ये ग्रंथोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त ‘ग्रंथचळवळ आणि महाराष्ट्र’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एस.राणे उपस्थित होते. पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, डॉ.किसन पाटील, चंद्रशेखर ठाकूर, विजय पाठक, रंगराव पाटील, शशिकांत हिंगोणेकर, रवींद्र ठाकूर उपस्थित होते.
दरम्यान, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.मुं.शिंदे यांनी ग्रंथोत्सवाला भेट दिली. कविसंमेलनात अशोक कोतवाल, शशिकांत हिंगोणेकर, प्रा.सत्यजित साळवे, प्रा.योगेश महाले, सुरेश यशवंत, प्रा.नामदेव कोळी, अमरसिंह राजपूत, रा.ना.कापुरे, प्रकाश तेलंग, पुष्पा साळवे, प्रफुल्ल पाटील, धनराज सोनवणे, बी.ए.पानपाटील, रविकांत कापुरे, अशोक पारधे, अनंत जाधव यांनी कविता सादर केल्या. मनोज गोविंदवार यांनी सूत्रसंचालन केले तर माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी आभार मानले
बालकलावंतांनी सादर केली भावगीते
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सोमवारी बालकलावंतांनी भावगीते सादर केली. बालकलाकार स्वरमयी देशमुख, अबोल कानडे, समृद्धी वाणी, ईश्वरी परांजपे, भूमिका वाघ, चैताली येवले, नंदिनी काळे, वैष्णवी कुळकर्णी, हर्षदा शिरसाळे, निकिता सपकाळे, माधुरी पाटील यांनी सहभाग घेतला. सविता वाणी, मी सावित्री नाटिकेच्या लेखक प्रिया सफळे यांचा सत्कार करण्यात आला.