आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट सोन्याची विक्री करणाऱ्याचा पर्दाफाश, गुन्हे शाखेच्या पथकाने एकास ताब्यात घेतले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रामानंदनगर परिसरात बनावट सोन्याची माळ विक्रीच्या प्रयत्नात असताना एका ठगाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रवविारी सायंकाळी ६.१५ वाजता गिरणा टाकीजवळून ताब्यात घेतले आहे. बनावट सोने जप्त केले. गिरणा टाकीजवळील किरणा दुकानात आॅगस्टला प्रकाश अर्जी बागरी (रा.खाडलभीम, जि.जालोर) हा राजस्थानचा तरुण आला. त्याने लक्ष्मण देवचंद शिरोळे (भूषण कॉलनी) यांच्या दुकानातून एक तेलाची पिशवी आणि चविडा विकत घेतला. कागदाची फुले बनवून विक्री करण्याचा या तरुणाचा व्यवसाय आहे. त्याने शिरोळे यांच्याशी ओळख वाढवण्यासाठी वस्तू विकत घेतल्या. रवविारी सायंकाळी वाजता प्रकाश पुन्हा शिरोळे यांच्या दुकानात आला. त्याने तीन खरे सोन्याचे मणी त्यांना दाखवले. पैशांची गरज असल्याने सोन्याच्या मण्यांची माळ विक्री करायची असल्याचे त्याने सांगितले. शिरोळे यांनीही विकत घेण्याची तयारी दर्शवली. प्रकाश सोनसाखळी घेण्यासाठी गेला. तेवढ्या वेळात शिरोळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला यासंदर्भात माहिती दिली. त्यावरून पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी राजेंद्र पाटील, श्रीकृष्ण पटवर्धन, संजय पाटील, रवींद्र गिरासे, विजय पाटील, प्रितम पाटील, दिनेश बडगुजर, जयंत चौधरी आणि प्रदीप पाटील यांचे पथक पाठवले. त्यांनी शिरोळे यांच्या दुकानाच्या परिसरात सापळा रचून प्रकाशला ताब्यात घेतले. याची कुणकुण लागल्याने कुसुंबा येथून त्याचे तिघे साथीदार फरार झाले.

कुसुंब्यात घेतले घर
प्रकाशबागरीने १५ दविसांपूर्वी कुसुंबा येथे एक हजार रुपये महिना भाडे असलेले घर घेतले होते. त्याच्यासोबत त्याचा मुलगा आणि तेजराम सवाजी बागरी (वय ३६), त्याची पत्नी मेनू तेजराम बागरी (वय ३०, रा.मुड्या, जि.जालोर) हे राहतात.