आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेहरूण तलावात आढळलेला मृतदेह शाहूनगरच्या तरुणाचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रक्षाबंधनाला मेहरूण तलावात आढळून आलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख रविवारी पटली. शाहूनगरातील दिनेश मानकुमर या तरुणाचा हा मृतदेह अाहे. त्याच्या कुटुंबीयांनी कपड्यांवरून तरुणाला ओळखले. दिनेश दशरथ मानकुमरे (वय २५) आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला असून त्यासंदर्भात तपास सुरू आहे. दरम्यान दिनेशच्या हातातील राखी कपडे यांचे फोटो पोलिसांनी सेव्ह करून ठेवले होते.
त्यानुसार रविवारी दिनेशचा चुलत भाऊ मनोज बहीण संगीता यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन ओळख पटवली. दरम्यान, ३० तासांपेक्षा जास्त वेळ दिनेशचा मृतदेह पाण्यात राहिल्यामुळे फुगलेला होता. त्यामुळे शुक्रवारी शवविच्छेदन करून शनिवारी दिनेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. कुटंुबीयांनी रविवारी ओळख पटवली, तोपर्यंत पोलिसांमार्फत दिनेशवर अंत्यसंस्कार झाल्यामुळे कुटंुबीयांना मृतदेह मिळाला नाही. शाहूनगरात मानकुमरे हे गरीब कुटंुब आहे. तर दिनेशच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. दिनेश हा अविवाहित असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...