आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Admission Start Of From May For 5th To 10th Class

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालवाडी, पहिली, पाचवीच्या प्रवेशासाठी पालकांची कसरत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. बालवाडी, पहिली पाचवीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची लगबग सुरू आहे. मात्र, शहरातील काही शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर काही शाळांमध्ये सुरू आहे.

बालवाडीमध्ये पाल्याचा प्रवेश घ्यायचा असेल तर पालकांची पसंती इंग्रजी माध्यमांना दिसून येते. तसेच पहिलीपासून सेमी इंग्रजी वर्गाकडे सुद्धा ओढा आहे. पाचवीपासूनही सेमी इंग्रजी अभ्यासक्रमावर काही पालकांचा भर आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाला मागणी आहे. परंतु यातच मराठी माध्यमांवरही सर्वसामान्य नागरिकांचा कल असल्याने मराठी माध्यमांच्या शाळांमध्येही प्रवेशप्रक्रिया एक महिन्यापासून सुरू आहे.
झांबरे विद्यालयात पाचवीच्या १७८ जागांवर प्रवेश
ए. टी. झांबरे विद्यालयात 5 वी ते १० वीपर्यंतची प्रवेशप्रक्रिया मे पासूनच सुरू झाली आहे. यात खासकरून पाचवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येतोय. पाचवीच्या तीन तुकड्यांसाठी साधारण २०० जागा असून १७८ प्रवेश देण्यात आले आहेत. यातील काही जागा शाळेच्याच प्राथमिक विभागातून उत्तीर्ण झालेल्या मुलांनाही देण्यात आल्या आहेत.
ला.ना. विद्यालयात पुढील आठवड्यात प्रक्रिया
ला.ना.विद्यालयात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश सुरू होणार आहेत. यात शासकीय नियमानुसार ४३० जागा पाचवीच्या भरण्यात येतात. मात्र, संस्थेच्या सु.ग.देवकर सु.वा.अत्रे या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवेशात प्राधान्य दिले जाते. साधारणत: ३५० जागा या विद्यार्थ्यांच्या असतात तर १०० जागा या इतर उर्वरित मुलांसाठी देण्यात येतात.
आर.आर.मध्ये प्रवेश फुल्ल
आर.आर.विद्यालयात 5 वी ते १० वी पर्यंतच्या जागा शिल्लक नसून प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण ६०० जागा हाेत्या. त्यापैकी पाचवीच्या ४७४ जागा भरण्यात आल्या असून इतर तुकड्यांमध्ये उर्वरित जागा भरण्यात आल्या. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया बंद झाली आहे. शाळेची विद्यार्थी संख्या जवळपास ३१०० आहे. तर बालवाडीच्या १५० जागा होत्या