आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Bank Will Start Holiday Issue At Jalgaon, Divya Marathi

बँका कर भरण्यासाठी सुटीच्या दिवशीही सुरू राहणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आर्थिक वर्षाचे शेवटचे दोन दिवस सुटी असल्याने बँकांमधील आर्थिक वर्षाच्या व्यवहारांचा निपटारा करण्यासाठी रविवार आणि सोमवारी बँका सुरू राहणार आहेत. शासकीय कर भरण्यासाठी ग्राहकांना या काळात मुभा देण्यात आली आहे. मात्र, ग्राहक नियमित व्यवहार करू शकणार नाहीत.

आर्थिक वर्षाचे व्यवहार निपटण्यासाठी रविवार आणि सोमवारी गुढीपाडव्याच्या सुटीच्या दिवशी बँका सुरू ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. शासकीय कराचा भरणा आणि निधी खर्च हिशेबाचे पत्रक क्लीअर करण्यासाठी बँकांचे अंतर्गत काम सुरू राहणार आहे. ग्राहकांची सेवा केवळ कराची रक्कम स्वीकारण्यापुरतीच सुरू राहणार असल्याचे सेंट्रल बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यात सर्वाधिक व्यवहार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेशी संबंधित आहेत.

आजच निपटा व्यवहार
व्यवहारांच्या निपटार्‍यासाठी ग्राहकांना शनिवारी शेवटची संधी आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी तीन दिवस उरले असले तरी दोन दिवस सुटी असल्याने शनिवारीच व्यवहार निपटावे लागणार आहेत.

नियमित व्यवहार राहतील बंद
शासकीय कराचा भरणा आणि चेक क्लिअरिंगसाठी बँका सुरू राहणार आहेत. या काळात ग्राहकांचे नियमित व्यवहार होऊ शकणार नाही. डी.के.निकम, डेप्युटी रिजनल मॅनेजर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया.

पालिकेत रविवारीही कर संकलन
आर्थिक वर्ष संपत असल्याने नागरिकांच्या सुविधेसाठी पालिका प्रशासनातर्फे रविवारीदेखील करभरणा सुरू ठेवण्यात येणार आहे. पालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील सहाव्या मजल्यावरील प्रभाग समिती एकच्या कार्यालयासह गिरणा टाकी, नानीबाई रुग्णालय आणि मेहरूण तलावाजवळील प्रभाग कार्यालयात कर संकलन सुरू राहील.

जिल्हा बँकेनेही घेतला पुढाकार
पीककर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च असल्याने शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने रविवारी आणि सोमवारी बँक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात शेतकरी पीककर्ज भरू शकणार आहेत.