आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Bright And Necessary For The Future: Naralikara

उज्‍जवल भविष्यासाठी आणखी संशोधन आवश्यक : नारळीकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-देशाचे वैज्ञानिक भवितव्य उज्‍जवल असून, त्यादृष्टीने होत असलेले संशोधनही समाधानकारक आहे. तसेच त्यात अत्याधुनिक संशोधनाची आणखी भर पडल्यास आपला देश अन्य प्रगत देशांच्या तुलनेत पुढे राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांनी केले. मूळजी जेठा महाविद्यालयात विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. प्रतिष्ठानचे प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांनी ही मुलाखत घेतली.

स्थिर स्थितीचा मांडला सिद्धान्त

डॉ.नारळीकर यांनी ‘बिग बॅँग थेअरी’ या विश्वनिर्मितीबाबतची माहिती कथन करून स्थिर स्थितीचा सिद्धान्त काय आहे? हे स्पष्ट करून सांगितले. तसेच आगामी काही वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर तीन महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले जाणार असून, त्यात भारताचाही सहभाग असणार आहे. यासह परदेशातील विविध अनुभव व तेथील शिक्षणपद्धतीविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. पुणे येथे सन 1948मध्ये झालेली ‘आयुका’ संस्थेची स्थापना व त्यामागील भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

सध्या सुरू असलेल्या भारताच्या मंगळ मोहिमेविषयी सांगताना ते म्हणाले की, स्वदेशी तंत्राचा आधार घेऊन या मोहिमेची वाटचाल सुरू असून, तिचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या मोहिमेमुळे भारत संशोधनाच्या दृष्टीने जपान व चीन या देशांच्या रांगेत येऊन बसला आहे. आजच्या प्रचलित शिक्षण व परीक्षापद्धतीत बदल करण्याची गरज असून, विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी लक्षात घेऊन आता परीक्षा घ्यायला हव्यात, असेही ते म्हणाले. या वेळी शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांतून आलेल्या भूगोल, विज्ञान व गणितविषयाच्या शिक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. त्याचप्रमाणे प्रा.मंगला नारळीकर यांनी गणित विषय सोपा करण्यासाठी विविध खेळांचा वापर करण्याच्या टिप्सही दिल्या.

यांची होती उपस्थिती


प्राचार्य अनिल राव यांनी प्रास्ताविकात प्रकट मुलाखतीमागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमास केसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, वन्यजीव संस्थेचे राजेंद्र नन्नवरे, आयएमआरचे संचालक डॉ.विवेक काटदरे उपस्थित होते